Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar: जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

चोडणकर: मुख्यमंत्र्यांनी खंवटेंना मंत्रिमंडळातून काढून टाकावे

दैनिक गोमन्तक

Girish Chodankar: पर्वरी येथील गुन्हेगारी घटनेवर मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केल्याचे सांगत, खून, जमीन बळकावणे, सरपंचाला धमकावण्यासाठी पोलिस-राजकारणी संगनमत, सेरुला कोमुनिदाद घोटाळा आणि अन्य प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, मी यापूर्वी पर्वरीचे आमदार, मंत्री रोहन खंवटे यांना काही प्रश्न जाहीरपणे विचारले, त्याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. त्यांचे मौन बोलके असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि चौकशी सुरू करावी. दरम्यान, खंवटे यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

चोडणकर म्हणाले, मंत्री खंवटे यांनी माझी सोडियम पातळी तपासण्याचा सल्ला दिला, त्यानुसार मी तपासणी करून घेतली आहे. अहवाल सकारात्मक असल्याने मी विचारलेले प्रश्न आता तरी गांभीर्याने घेऊन त्यांनी उत्तरे द्यावीत.

‘गोव्यात काय चालले आहे?’ तुम्ही वकिलाशी असे कसे वागू शकता? वकिलाला मारहाण झाल्यास बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार करण्याचे धाडस कोणी करणार नाही. उद्या ते आपल्यावरही (न्यायाधीशांवर) हल्ला करू शकतात. कोणीही सुरक्षित राहणार नाही, हे निरीक्षण जॉन मिनेझिसच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने नोंदवले होते, ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले होते आणि जेव्हा त्यांचे वकील ओलाव अल्बुकर्क हे पाहणीसाठी आले, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

दोषींवर कारवाईची मागणी करण्याऐवजी, खंवटे यांनी पोलिसांवर मोर्चा काढला आणि अल्बुकर्कला अटक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. आणखीन एका प्रकरणात सरपंचाला धमकी देणाऱ्या पोलिसांनी खंवटे यांचे नाव घेतले असून, त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

‘पर्वरी फाईल’ चित्रपट...

चोडणकर म्हणाले, पर्वरी येथे अनेक प्रकरणे आणि घटना आहेत,ज्यांची चौकशी व्हायला हवी. पंचायतीच्या राजकारणावरून सरपंचाला धमकावण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. आवाज उठवल्याबद्दल आरटीआय कार्यकर्त्याची कथितपणे हत्या केली जात आहे आणि जमीन बळकावण्याचे घोटाळे होत आहेत. या सगळ्याची एकतर सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हायला हवी. तेथील गुन्हेगारीवर ‘पर्वरी फाईल’ हा एक चांगला चित्रपट बनू शकतो. या माध्यमातून सत्तेत असलेले राजकारणी सत्तेचा वापर करून लोकांमध्ये भीती कशी निर्माण करत आहेत आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये कसे गुंतलेले असतात, हे समोर आणू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT