Arrest|Jail|Crime Canva
गोवा

Goa CBI Raid: लाचप्रकरणी 'त्या' दोघांना 7 दिवसांची पोलिस कोठडी; अतुल पाठोपाठ पंकज कुमारलाही अटक

Panaji CBI Raid: आयकर खात्याच्या ‘सीबीडीटी’ विभागातील साहाय्यक लेखा अधिकारी अतुल वाणी याच्यापाठोपाठ पंकज कुमार याला लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाने अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

CBI Arrests Income Tax Officer for Bribery

पणजी: आयकर खात्याच्या ‘सीबीडीटी’ विभागातील साहाय्यक लेखा अधिकारी अतुल वाणी याच्यापाठोपाठ पंकज कुमार याला मनुष्यबळ सेवा पुरवणाऱ्या सुकूर पर्वरी येथील मे. राज एंटरप्रायझेस कंपनीची बिले मंजूर करण्यासाठी एक लाखाची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाने अटक केली.

आज त्या दोघांना पणजीतील सीबीआय विशेष न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. संशयित वाणी याने जामिनासाठी अर्ज केला, त्यावर सीबीआयला उत्तर देण्यास न्यायालयाने वेळ दिली आहे.

आयकर खात्यामध्ये मनुष्यबळ सेवा पुरवणाऱ्या कमलाकांत चतुर्वेदी यांनी अतुल वाणी व पंकज कुमार या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी सेवा पुरविलेल्या कामाची सात महिन्यांची बिले थकीत होती. ही बिले मंजूर करण्यासाठी त्यांनी २ लाख रुपयांची लाच मागितली होती. लाच न दिल्यास बिले मंजूर केली जाणार नाही असे संशयितांनी स्पष्ट सांगितले होते.

त्यानंतर ही रक्कम घासाघीस करून एक लाख देण्यावर निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार तक्रार नोंद करून सीबीआयने लाचखोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. पंचनामा करून आयकर खात्यातील चतुर्वेदी यांच्या कंपनीच्या बिलांचा दस्तावेज ताब्यात घेतला. काल मध्यरात्रीपर्यंत संशयितांची चौकशी व दस्तावेज तपासणीची कारवाई पाटो - पणजी येथील आयकर मुख्यालयाच्या कार्यालयात सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय गोवाचे उपअधीक्षक अर्जुन कुमार मौर्या यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप हळदणकर करीत आहेत.

असा रचला सीबीआयने सापळा

तक्रारदार कमलाकांत चतुर्वेदी यांनी अतुल वाणी व पंकज कुमार यांच्याशी संपर्क साधला व ते एक लाख रुपये घेऊन येत असल्याची फोनवरून माहिती दिली. त्यानुसार त्यांनी चतुर्वेदी यांना पाटो - पणजी येथील मध्यवर्ती वाचनालय असलेल्या रस्त्यावर येण्यास सांगितले.

ते दोघे काळ्या रंगाच्या गाडीतून आले व चतुर्वेदी जेथे थांबले होते त्या ठिकाणी थांबले.

अतुल वाणी व पंकज कुमार या दोघांनी पैसे स्वीकारल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी ही गाडी अडवली. दोघांनाही ताब्यात घेतले व तक्रारदाराकडे जी रक्कम देण्यात आली होती ती जप्त केली.

सीबीआयने या पैशांच्या नोटावरील क्रमांक अगोदरच नोंद करून ठेवले होते तसेच नोटांना फिनोफ्थिलिन पावडर लावलेली होती. संशयितांच्या हाताला पैसे स्वीकारल्याने ही पावडर लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT