CBI Arrested New channel commercial Head  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'आप'च्या प्रचारासाठी दिले 17 कोटी रूपये; आता अडकला सीबीआयच्या जाळ्यात

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी न्यूज चॅनेलच्या कमर्शिअल हेडला अटक; सीबीआयची कारवाई

Akshay Nirmale

Delhi Excise Policy Scam: दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी ईडी आणि सीबीआय स्वतंत्रपणे तपास करत आहेत. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणांनी आत्तापर्यंत अनेकांना अटक केली आहे. आता सीबीआयने नोएडास्थित एका वृत्तवाहिनीच्या कमर्शिअल हेडला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

जून 2021 ते जुलै 2022 या कालावधीत या अधिकाऱ्याचा हवाला मनी ट्रेलमध्ये सहभाग असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. अरविंद कुमार सिंग असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो नोएडास्थित एका खासगी वृत्तवाहिनीचा कमर्शिअल हेड आहे.

दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणातील 17 कोटी रुपये आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी हस्तांतरित केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. तो जून 2021 ते जुलै 2022 पर्यंत हवाला मनी ट्रेलमध्ये सामील होता.

तपासादरम्यान CBI ने ऍक्सेस केलेल्या हवाला ऑपरेटर्सच्या WhatsApp चॅट रेकॉर्ड्सवरून ही माहिती समोर आली आहे.

अरविंद यांनी जून 2021-जानेवारी 2022 दरम्यान गोवा निवडणुकीत AAP साठी जाहिरात मोहीम चालवणाऱ्या मीडिया कंपनीला 17 कोटी रूपये हस्तांतरित केले होते. हे पैसे हस्तांतरीत करताना या व्यवहारात अरविंद याने कथितपणे ऑपरेटर म्हणून काम केल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली सरकारच्या 2021-22 साठीचे मद्यधोरण काही व्यापाऱ्यांना, विक्रेत्यांना अनुकूल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विक्रेत्यांनी सरकारला लाच दिली होती, असा आरोप आहे. सत्ताधारी 'आप'ने हे आरोप फेटाळले आहेत. तथापि, नंतर ही पॉलिसी रद्द करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या गोडव्यावर महागाईचे सावट! साहित्याचे दर वाढले; वाण खरेदीसाठी बाजारात लगबग

Goa Tourism: देशी, विदेशी पर्यटक वाढले! चार्टर विमानांच्या लँडिंगमध्ये वाढ; पर्यटन खात्‍याचा दावा

Abhang Repost: ‘रेव्‍ह पार्ट्या - ड्रग्स पार्ट्या सुरू, अभंगा’वर मात्र बंदी'! 'अभंग रिपोस्ट' रद्द केल्याने रसिक संतप्त Watch Video

Transcend Goa 2026: देशातील 1ल्या ‘ट्रान्समीडिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन गोव्यात! भविष्याकडे पाहणारे व्यासपीठ; स्थानिक ‘कंटेंट’ला प्रोत्साहन

‘देव बरे करू!’ गोव्याच्या आत्म्याचे संगीतमय दर्शन, खरी संस्कृती जगासमोर; उलगडला समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडील गोवा

SCROLL FOR NEXT