Cattle on Bicholim-Dodamarg road Dainik Gomantak
गोवा

डिचोली-दोडामार्ग रस्त्यावर गुरांचे साम्राज्य

वाहतुकीस अडथळा; अपघातांची शक्यता

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोली-दोडामार्ग रस्त्यावरील म्हावळींगे परिसरात मोकाट गुरांचे साम्राज्य वाढले आहे. या रस्त्यावर गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या मोकाट गुरांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मनस्ताप तर सहन करावा लागतच आहे.

उलट आधीच धोकादायक बनलेल्या या रस्त्यावर गुरांमुळे लहान सहान अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळीही गुरे रस्त्यावर ठाण मांडून असतात. या गुरांमुळे एखादेवेळी भयानक अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डिचोली-दोडामार्ग रस्त्यावरील म्हावळींगे परिसरात तर मोकाट गुरांची समस्या अधिक जाणवते. नेस्ले कंपनीच्या मुख्य फाटकाजवळ तर बऱ्याचदा कळपाने गुरांचा वावर असतो. आधीच नेसले परिसरात रस्त्याच्या बाजूने पार्क केलेली अवजड वाहने, त्यातच रस्त्यावर कळपाने गुरांचा संचार यामुळे रस्त्यावर वाहने हाकताना वाहनचालकांना कसरत करावी लागते.

मोकाट गुरांच्या वाढत्या संचारामुळे या रस्त्यावर एखादेवेळी भयानक अपघात घडण्याची शक्यता आहे. तशी भीतीही वाहनचालक व्यक्त करीत आहेत. पंचायत वा अन्य संबंधित यंत्रणेने या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी वाहनचालकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

India vs Pakistan: ''टीम इंडियाला हलक्यात घेऊ नका, ते सहज हरवू शकतात", शोएब अख्तर घाबरला, पाकिस्तानला दिला 'हा' इशारा

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

SCROLL FOR NEXT