Water Sports |Casino
Water Sports |Casino Dainik Gomantak
गोवा

Water Sports Goa: कॅसिनो, वाॅटर स्पोर्ट्सचे दर वाढण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

Water Sports Goa: कॅसिनो, तरंगती हॉटेल्स व रेस्टॉरेंट, नदी क्रूझ जहाज, मासेमारी, जलक्रीडा, तरंगती जेटी, पॉंटून इत्यादींसाठी विविध सेवांसाठी भाडे शुल्क भरमसाट वाढ करणारी मसुदा अधिसूचना बंदर कप्तान खात्याने काल जारी केली आहे. या अंतर्गत प्रती महिन्याला प्रती चौरस मीटर प्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.

यामुळे वरील सेवा देणारे आपल्या सेवा शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे. परिणामी याचा भुर्दंड पर्यटनासाठी आलेल्या ग्राहकांवरच पडणार आहे.

बंदर कप्तान विकास गावणेकर यांनी सांगितले, की बंदर खात्याशी निगडित घटकांना सूचना देण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर बंदर कप्तान दुरुस्ती नियम 2023 म्हणून सरकारकडून निश्‍चित केले जाईल.

काही सेवांसाठी प्रति चौरस मीटर दरमहा निश्‍चित असलेलेभाडे शुल्क वाढवण्यात आले आहे. पूर्वीचे शुल्क दर केवळ 10 रुपये प्रती चौरस मीटर असल्याने खात्याला महसूल मुक्त होते.

त्या तुलनेत कॅसिनो, रेस्टॉरेंट, क्रूझ, खनिज माल लॉडिंग सारख्या व्यवसायांची बऱ्यापैकी कमाई होत असून खात्याला देखील महसूल मिळावे, यासाठी शुल्क वाढ करण्यात आली आहे.

नवे शुल्क असे

  • मूरिंग शुल्क कॅसिनो, तरंगते हॉटेल आणि रेस्टॉरेंटसाठी 500 रुपये, तरंगती जेटी, प्लॅटफॉर्म, पॉंटून 400, तरंगते जहाज 500 रुपये, इतर 50 रुपये.

  • जेटीवरील जागा कॅसिनो कार्यालयासाठी 3000 हजार रुपये, नदी क्रूझ जहाज 100 रुपये, मासेमारी 50 रुपये, जलक्रीडा 50 रुपये,

  • नदीकाठी असलेल्या जमिनीचा वापर लोडिंग काँक्रीट जेटी 100, कारखान्यांसाठी 200, तात्पुरती लाकडी जेटी 100, मासेमारीची जाळी उतरवण्यासाठी 100, नदीत पारंपारिक मच्छिमारांसाठी मासेमारी पिंजरे, रॅक, स्टेक बसवणे 10 रुपये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist Rush At Morjim Beach: मोरजी समुद्रकिनाऱ्यावर तोबा गर्दी; पर्यटकांसह स्थानिकांचीही वळली पावले

Monsoon Health Care: आला पावसाळा, काळजी घ्या, आरोग्य सांभाळा! मलेरिया डेंग्यूबाबत जागृती आवश्‍यक

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Goa Cyber Crime: नोकरीच्या बहाण्याने विनयभंग; संशयिताला बंगळुरूमध्ये अटक

Goa Money Laundering Case: वेश्या व्यवसायातील 21 कोटी हवालाद्वारे परदेशात; मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT