Margao Fire News Dainik Gomantak
गोवा

Cashew News: काजू बियांच्‍या गाेदामाला आग; दहा लाखांचे नुकसान

Cashew News: रिवण येथील एका गोदामाला शुक्रवारी (ता.२) दुपारी आग लागून आतील काजू बिया व सुपारी जळून खाक झाल्याने नागेश प्रभुदेसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Cashew News: रिवण येथील एका गोदामाला शुक्रवारी (ता.२) दुपारी आग लागून आतील काजू बिया व सुपारी जळून खाक झाल्याने नागेश प्रभुदेसाई यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुडचडे अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी रिवण येथे शेतातील सुक्या गवताला भर दुपारी अज्ञाताने आग लावल्याने आग सर्वत्र पसरली.

या शेतात नागेश प्रभुदेसाई यांचे दुकान असून त्यांनी दुकानाच्या वरच्या मजल्यावर पेपर रद्दी, सुपाऱ्या तसेच काजूबियांची साठवणूक केली होती. या आगीची झळ दुकानाला बसल्याने आतील साहित्याने पेट घेतला.

या आगीची माहिती कुडचडे अग्निशामक दलाला दिली असता अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

या आगीत काजू बिया तसेच सुपाऱ्या जळून गेल्या असल्याचे कुडचडे अग्निशामक दलाचे निरीक्षक दामोदर जांबावलीकर यांनी सांगितले. या आगीत दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकानमालक प्रभुदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT