Fire Caught Cashew Baug (Kaju Baug) in Bicholim | Marathi News Dainik Gomantak
गोवा

Fire At Cashew Farm: डिचोलीत काजू बागायतींना आग

Kaju Baug News: पाच ठिकाणी हानी : सर्वण, हळदणवाडी, पाटो-मये, गोठण-बोर्डे, सिकेरी येथील घटना

दैनिक गोमन्तक

Fire At Cashew Farm:

डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात आज बुधवारी एकाच दिवशी पाच ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. दोन ठिकाणी काजू बागायतींना आगीची झळ बसली. या घटनांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्‍यान, लागोपाठ घडलेल्या या आगीच्‍या घटनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना धावपळ करावी लागली. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्‍यांना घाईघाईने जावे लागले.

डिचोली-साखळी रस्त्याशेजारी सर्वण परिसरात माळरानाला आग लागली. भर दुपारच्या वेळी आग लागल्याने ज्वाळा भडकल्या. आग नियंत्रणात येईपर्यंत काही काजूची झाडे होरपळली. तर, हळदणवाडी आणि पाटो-मये येथे मिळून दोन ठिकाणी आग लागली. या आगीतही काजू बागायतीला झळ बसली. गोठण-बोर्डे येथेसुद्धा काजू बागायत आगीच्‍या भक्ष्‍यस्थानी पडली.

अग्निशमन दलाच्‍या जवानांची धावपळ

डिचोली अग्निशमन दलाचे लीडिंग फायर फायटर राजन परब आणि उदय मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या ठिकाणी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. संदीप परब (चालक),

रामदास परब, आनंद नाईक, रावजीराव राणे, विष्णू राणे, संतोष तानोडे, हर्षद सावंत, लवसिंग पिल्ले, कपिल गावस आणि रुपेश पळ या जवानांनी मदतकार्यात सहभाग घेतला. दोन लाखांहून अधिक रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. एकाच दिवशी पाच ठिकाणी आग लागल्‍यामुळे त्‍यांची धावपळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: सावर्डे पंचायतीची प्रलंबीत इमारत,कर्मचारी कमतरता दूर करणार

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT