MLA Divya Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew: काजूगरांना GI Tag मिळाल्यास फसवणूक थांबेल, उत्पादन वाढल्यास किंमतही वाढेल! डॉ. दिव्या राणेंचे प्रतिपादन

Divya Rane: राज्यात जर काजू बियांचे उत्पादन वाढले तर किमतही वाढेल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना जादा मोबदला मिळण्यात होणार आहे असेही डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील काजूबियांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने काजूबियांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. दरवर्षी ‘काजू महोत्सव’ आयोजित करून काजू झाडे लावण्यासंदर्भात तसेच उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊ लागली आहे.

सरकारने काजूगराला ‘जीआय टॅग’ दिल्यास बनावट काजूगर विक्रीला आळा बसू शकतो. त्याचा प्रस्ताव देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दिली.

काजूबियांना दरवाढ करून देण्याची मागणी कृषीमंत्र्यांकडे केल्यानंतर गेल्या तीन वर्षांनंतर ती १२० वरून १७० रुपये करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी प्रतिकिलो २०० रुपये किमतीची मागणी केली होती, त्यासाठी सरकारकडे प्रयत्न केले जातील. या दरवाढीमुळे काजूबियांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. .

राज्यात जर काजू बियांचे उत्पादन वाढले तर किमतही वाढेल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना जादा मोबदला मिळण्यात होणार आहे. काजूला मार्केटमध्ये चांगला दर मिळू शकतो, असेही डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले

बाेगस काजूगर विक्रीला आळा बसावा!

गोव्यातील काजूगरांबरोबर मिश्रित काजूगर बाजारपेठेत येऊ लागले आहेत. ‘गोवा काजू’ या ब्रँडने त्याची विक्री केली जात आहे, हे बंद होण्याची गरज आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन खात्याला याची तपासणी करण्यासाठी पत्र पाठविल्यानंतर गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले व बनावट काजू बिया जप्त करण्याबरोबरच काही आस्थापनेही बंद करण्यात आली. काजूगराला ‘जीआय टॅग’ मिळाल्यावरच त्यावर नियंत्रण येणार आहे.

गोव्याच्या फेणीला ‘जीआय टॅग’ मिळाल्यानंतर बनवाट फेणीवर आळा बसून गोव्यातील फेणीच्या उत्पादनात वाढ झाली. त्याचा फायदा फेणी डिस्टिलिरीजला झाला आहे व फेणीलाही चांगली किंमत मिळू लागली आहे. त्याप्रमाणे काजूगराला हा ‘जीआय टॅग’ मिळाल्यावर ‘गोवा काजू’ नावाचा वापर करता येणार नाही. या टॅगनुसार ग्रेड मिळणारे काजूगरच विकता येतील, अशी माहिती आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT