Cashew Fest Goa 2024 Season 2 Dainik Gomantak
गोवा

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

Cashew Fest Goa 2024 Season 2: गेल्यावर्षी पासून गोव्यात काजू महोत्सवाचे आयोजन केले जात असून, यावर्षी त्याचा दुसरा सीझन आयोजित केला जात आहे.

Pramod Yadav

Cashew Fest Goa 2024 Season 2

गोव्यात येत्या शुक्रवारपासून (१० मे) प्रसिद्ध काजू महोत्सव सुरु होणार आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी देखील महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

पणजीतील कांपाल मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवासाठी सर्वांना मोफत प्रवेश असेल.

दादासाहेब बांदोडकर मैदान, कांपाल मैदान येथे आयोजित करण्यात येणाऱ्या काजू महोत्सवाला दहा मेपासून सायंकाळी 4:30 वाजता सुरुवात होईल.

10, 11 आणि 12 मे रोजी आयोजित या महोत्सवासाठी सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

महोत्सवात 50+ पेक्षा अधिक खाद्यपदार्थ आणि विविध प्रकारच्या पेयांचे स्टॉल असतील. याशिवाय या महोत्सवात गोवन तसेच, राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध कलाकार विविध सादरीकरण करतील.

गोव्यातला कडक उन्हाळा आणि याच काळात मिळणारी ताजे हुर्राक आणि फेनीचे आकर्षण देशी व विदेशी पर्यटकांना असते. याचा देखील आस्वाद या महोत्सवात घेता येईल.

गेल्यावर्षी आयोजित या महोत्सवाला नागरिक आणि पर्यटकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, यावर्षी काजू महोत्सवाचा दुसरा सीझन येत असून, नागरिकांनी महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

Goa News Live: Formula – 4 मुरगावमध्ये होणार; मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT