Kaju Feni Dainik Gomantak
गोवा

Goa Assemby: विमानतळांवर काजू फेणीची करमुक्त विक्री व्हावी; दिव्या राणे

Divya Rane On Kaju Feni: काजू, काजू फेणीला प्राधान्य देण्यासाठी गोवा वनविकास महामंडळातर्फे आवश्‍‍यक ती सर्व पावले उचलण्‍यात येत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्यातील काजूला, काजू फेणीला प्राधान्य देण्यासाठी गोवा वनविकास महामंडळातर्फे आवश्‍‍यक ती सर्व पावले उचलण्‍यात येत आहेत. गोव्याच्या फेणीला आणखी प्रसिद्धी मिळावी, तिची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी आता आंतरराष्ट्रीय विमानतळांवर फेणीची करमुक्त विक्री होणे गरजेचे आहे, असे पर्येच्‍या आमदार तथा वनविकास महामंडळाच्‍या अध्‍यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले. विधानसभेत विविध खात्यांच्या मागण्यांवेळी त्‍या बोलत होत्या.

माहिती आणि प्रसिद्धी खाते, पर्यटन खाते यांच्‍या माध्यमातून गोव्यातील काजूबाबत प्रचार होणे गरजेचे आहे. येथील स्थानिक काजूला जी-आय टॅग मिळाला आहे. आजही राज्‍यातील मार्केटमध्ये अनेक ठिकाणी बाहेरून आयात केलेला काजू ‘गोव्यातील काजू’ म्हणून सर्रास विकला जातोय.

गोव्यातील काजूचा दर ७०० रुपये किलो आहे तर बाहेरून आयात केलेल्‍या काजूची ४०० रुपये किलो दराने विक्री केली जातेय. याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी दिव्‍या राणे यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

Viral Video: अतिथी देवो भव… पण पाहुण्याची अशी बेइज्जती, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; नेटकऱ्यांनी घेतली मजा!

मुस्लिम राष्ट्रासाठी पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन लोकांवर अत्याचार करण्यात आले; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

IND vs PAK: ‘इतकी धुलाई करतील की...' पाकिस्तानी दिग्गजाला भारतीय बॅटर्स धास्ती; आशिया कपमधील भारत-पाक सामन्यावर मोठं वक्तव्य

Janmashtami 2025: फक्त 43 मिनिटांचा शुभकाळ, मग कधी आणि कशी कराल गोकुळाष्टमीची पूजा?

SCROLL FOR NEXT