CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Land Scam: गोव्यात काय चाललंय? नोकरीनंतर आता भूखंड विक्री घोटाळा; अंध तरुणीची ८ लाखांची फसवणूक, सीएम Action Mode मध्ये

CM Pramod Sawant: हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे,असे सांगून या प्रकरणाची चौकशी पोलिसांमार्फत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Land Scam CM Pramod Sawant Orders Strict Action

पणजी: पर्वरी-हाऊसिंग बोर्ड येथे भूखंड देण्याचे आमिष दाखवून मडगाव येथील मुनीरूद्दीन खान व त्यांची अंध मुलगी सुमेरा खान यांना ८ लाख रूपयांना फसविल्याची तक्रार मडगाव टाऊन पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

या संदर्भात तक्रारदार मुनीरूद्दीन खान व सुमेरा खान यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची साखळीत भेट घेतली. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे,असे सांगून या प्रकरणाची चौकशी पोलिसांमार्फत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, हा फसवणुकीचा प्रकार गेल्या २०२० साली घडला होता. मडगाव (Margaon) येथील एक एसी मेकॅनिक सिराजुद्दीन खान हा आपल्याकडे आला व त्याने संशयित सादिक शेख हा पर्वरी येथे हाऊसिंगबोर्डचा भूखंड विकत देऊ शकतो. शक्य असल्यास आपण घेऊ शकता, असे सांगून मागे लागल्यामुळे आपण सदर भूखंड पाहण्यास तयार झालो,असे मुनीरुद्दीन याने सांगितले.

कारवाई होणार, मुख्यमंत्री

सरकारी नोकरी घोटाळापाठोपाठ आता भूखंड विक्री घोटाळाही समोर आला आहे. संशयित सादिक याला पणजी पोलिसांनी नसरिन बानू या तरुणीलाही भूखंड व नोकरी (Job) देण्यासाठी तिच्याकडून ५.५० लाख रुपये घेतल्याची तक्रार नोंद करून अटक केली आहे. त्याने सुमेरा खान हिलाही फसविल्याने त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकांनी सावध व्हावे!

सदर सादिक शेख या युवकाने पैशांच्या आशेपोटी एका अंध मुलीची फसवणूक करून त्यांना लुबाडणे हा अत्यंत खेदजनक प्रकार आहे. मानवतेला काळीमा फासणारा हा प्रकार असून लोकांनीच अशा प्रकारणांतून आज शिकायला हवे. गोव्यात आज अनेक प्रकारे लोकांची फसवणूक करण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. त्यांना पैसे देण्यापासून स्वतः सावध होणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT