Goa Youth Congress Dainik Gomantak
गोवा

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Youth Congress: शुक्रवारी (22 नोव्हेंबर) युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.

Manish Jadhav

म्हार्दोळ: कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रोज नव-नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाची तात्काळ न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विरोधक करत आहेत. मात्र सरकार त्यांच्या या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

यातच, शुक्रवारी (22 नोव्हेंबर) युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. यावेळी, पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कला सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे (Govind Gawade) यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री आणि गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत दोघांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्यातील आठ विरोधी पक्षातील नेत्यांनी फातोर्डा येथे एकत्र या प्रकरणाच्या संदर्भात पुढील रणनिती आखण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीला विधानसभा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई (Vijai Sardesai), व्हेंझी व्हिएगस, विरेश बोरकर, कार्लुस फेरेरा यांसारख्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

या बैठकीतच कॅश फॉर जॉब प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याचे ठरले होते. राज्यात फोफावत चाललेल्या या घोटाळ्याकडे लक्ष देण्याची आणि कारवाई करण्याची मागणी या पत्रातून विरोधकांनी केली.

पार्सेकरांचा घरचा आहेर

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ट नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कॅश फॉर जॉब प्रकरणी सावंत सरकारला घरचा आहेर दिला होता. पार्सेककरांनी याप्रकरणी रोखठोक प्रतिक्रिया दिली होती.

पार्सेकर म्हणाले होते की, ''पोलिस विभागाने योग्य तपासाशिवाय कोणालाही प्रमाणपत्र देऊ नये. एजंटांना अटक करण्यात आली असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य झालेले नाही. माझ्या कार्यकाळात असे काही प्रकरण सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडले असते. हा घोटाळा म्हणजे तरुण पिढीवर होणारा अन्याय आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'जे गोव्यात परतले, त्‍यांचीही पर्यटक म्‍हणून नोंद'! लोबोंचा ‘घरचा आहेर’; पर्यटनमंत्र्यांनी दिला बदनामी न करण्याचा सल्ला

Goa GMC: 'गोमेकॉ'मध्ये आणताना 88 रुग्‍ण दगावले! विधानसभेत आरोग्‍यमंत्र्यांच्या उत्तरातून माहिती समोर

Goa Police: 'गोवा पोलिस सर्वात खराब, कोलवा बीचवर मला भीती दाखवून 2,000 लाच घेतली'; पोलिसांवर गंभीर आरोप

Dog Attack: बोगमाळोत कुत्र्याने घेतला पादचाऱ्याचा चावा, रहिवाशाविरुद्ध वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

Parra: 'आमच्यावरील गुन्हे मागे घ्या'! भूमिका, साखळेश्वर देवस्थान वाद; पर्येतील शेकडो नागरिकांची पोलिस स्थानकावर धडक

SCROLL FOR NEXT