Priya Yadav Arrested in Maharashtra Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: कोल्हापूरातून आवळल्या प्रिया यादवच्या मुसक्या; 9 लाखांचे दागिने आणि 4 वाहने जप्त

Priya Yadav Arrested in Maharashtra: तपासादरम्यान समोर आले की, प्रिया यादवने रेल्वेत नोकरी/दुकान देण्याच्या बहाण्याने डिचोलीतील अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून 1 कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केली.

Manish Jadhav

राज्यात पूजा नाईक प्रकरण गाजत असतानाच आता डिचोलीतील अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून कोटींचा गंडा घालणाऱ्या प्रिया यादवला अटक करण्यात आली आहे. प्रियाला कोल्हापूरातील फुलेवाडी येथून अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पोलिस प्रियाच्या शोधात होते. प्रियाकडून यावेळी 116 ग्रॅम सोन्यासह 4 वाहने जप्त करण्यात आली. सोन्याची किमत सध्याच्या बाजार भावानुसार 9 लाख रुपये आहे.

कोटींची फसवणूक

तपासादरम्यान समोर आले की, रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने प्रियाने तब्बल 1 कोटींचा गंडा घातला. तपासात असेही समोर आले आहे की, प्रियाचे कोणतेही वैयक्तिक बँक अकाऊंट नाही किंवा तिच्या नावावर कोणतेही वैयक्तिक वाहन नोंदणीकृत नाही.

महाराष्ट्रातून अटक!

डिचोली पोलिस ठाण्यात प्रियाविरुद्ध फसवणूकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. डिचोली पोलिसांची टीम प्रियाच्या शोधात महाराष्ट्रात पोहोचली. कोल्हापूरातील फुलेवाडी येथून प्रियाला अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई डिचोलीचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली आणि उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय दिनेश गाडेकर, पीएसआय विकेश हडफडकर, पीसी विशाल परब, एलपीसी स्मिता पोपकर यांच्या पोलीस पथकाने पार पाडली.

प्रिया यादव होती फरार

रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य कारणांवरून संशयित प्रियाने डिचोलीतील अनेकांना लाखो रुपयांची टोपी घालून ऑगस्ट महिन्यात पलायन केले होते. तिच्या विरोधात काहीजणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. प्रियाने काही महिलांसह 20 हून अधिकजणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे सांगण्यात आले. ती लहान मुलीसमवेत डिचोलीत एका फ्लॅटमध्ये राहात होती. दोन महिन्यांहून अधिक काळ प्रिया फरार होती. अखेर डिचोली पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या.

‘मास्टरमाईंड’ पोलिसाचे निलंबन

प्रियाने काहीजणांकडून आपल्यासह मुलीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे उकळल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या कामात प्रियाला मदत केल्याच्या आरोपावरुन तसेच ‘मास्टरमाईंड’असल्याच्या संशयावरुन रोहन वेंझी या पोलिसाला निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT