Cash For Job Scam: पात्र उमेदवारांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे! सरदेसाईंनी केली पोलखोल

Vijay Sardesai on Cash For Job Scam: आमदार विजय सरदेसाई यांनी केली LDC पदांच्या भरतीबद्दल पोलखोल
Vijay Sardesai on Cash For Job Scam: आमदार विजय सरदेसाई यांनी केली LDC पदांच्या भरतीबद्दल पोलखोल
Sardesai on LDC Scam Dainik Gomantak
Published on
Updated on

Cash For Job Scam

पणजी : काही दिवसांपूर्वी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील लोवर डिव्हिजन क्लार्क (LDC) पदांच्या भरतीसाठी लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एक महिला सरकारी नोकऱ्यांच्या बदल्यात उमेदवारांकडून लाच मागत असल्याच्या आरोप करत अनेक व्यक्ती पुढे येत होते.

वारंवार या संपूर्ण विषयावर मत प्रकट करणारे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी पुन्हा एका मोठी पोलखोल केलीये. मुख्य सचिव (गोवा सरकार)च्या नावे एक पत्र जारी करत त्यांनी महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला आहे.

आपल्या पात्रात गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणतात की, LDC पदांची भरती करून घेताना दक्षिण गोवा जिल्हाधीकाऱ्यांकडून लाच घेतली गेल्याने आर्थिक सक्षण नसलेल्या अनेकांना यामुळे डावलण्यात आलं.

1 ऑक्टोबर 2023 च्या परीक्षेपासून सुरू झालेली भरती प्रक्रिया निकाल जाहीर करण्यात सात महिन्यांच्या विलंबामुळे वादग्रस्त ठरली. सदर पत्रात LDC पदांची नियुक्ती करताना चार वेळा निकाल बदलला गेल्याचाही ते दावा करतात आणि अनेकांनी याबद्दलची याचिका आपल्यासमोर मांडली असल्याचं सरदेसाई सांगतात.

हा विषय खरोखर गंभीर असल्याने तात्काळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि महसूल मंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे असं त्यांनी मागणी केलीय.

Vijay Sardesai on Cash For Job Scam: आमदार विजय सरदेसाई यांनी केली LDC पदांच्या भरतीबद्दल पोलखोल
Anant Chaturdashi 2024 Goa: दुर्मिळ शंखाला नमस्कार ते शाळीग्रामाची पूजा; गोव्यात अनंत चतुदर्शी कशी साजरी केली जाते?

याशिवाय कौशल्य चाचणी घेणाऱ्या डिचोली पॉलिटेक्निक कॉलेजच्या दोन अधिकाऱ्यांनी निकालात फेरफार केल्याचे चौकशीत समोर आल्याचा मुद्दा सरदेसाई यांनी पत्रात मांडला. विरोधी पक्षनेत्यांनी भरती प्रक्रिया रद्द करण्याची आणि घोटाळ्यात सामील असलेल्यांचा शोध घेण्यासाठी निष्पक्ष तपास सुरू करण्याची मागणी केली आहे.

एवढंच नाही तर लगेचच LDC नोकरभरतीची प्रक्रिया थांबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सदर घटनेमुळे स्थानिकांचा विश्वास भंग झाला असल्याने भरतीच्या प्रक्रिया सुव्यवस्थित व्हावी आणि अन्याय झालेल्या सर्व पात्र उमेदवारांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे अशी मागणी सरदेसाईंनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com