Cash For Job Scam Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: मेक्सिकोत नोकरीचं आमिष; गोमंतकीय तरुणाला 7 कोटींचा गंडा, मडगावात एजंटविरोधात तक्रार दाखल

Cash For Job: परदेशात चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी उकळल्याची घटना कावरे केपे येथून समोर आली आहे.

Sameer Amunekar

मडगाव: राज्यात सध्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. गोव्यातील तरुणांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लाखो रुपये लाटण्यात आले. यातच आता, परदेशात चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी उकळल्याची घटना कावरे केपे येथून समोर आली आहे.

कावरे केपे येथील मयूर देविदास यांनी विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनावरून ७ कोटी रुपयांचा फसवणुकीचा आरोप केला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये एका एजंटने त्यांना विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊनही नोकरी न मिळाल्याने मयूर देविदास यांनी संबंधित भामट्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

एजंटने त्यांना जहाजावर नोकरी मिळवून देण्यासाठी १२,५०,००० रुपये, सरकारी पदासाठी २०,००,००० रुपये, आणि अमेरिकेत नोकरीसाठी १३,००,००० ते १४,००,००० रुपये शुल्क आकारले जाईल, असे सांगितले होते. या रकमेत सर्व प्रक्रिया, व्हिसा, आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केली जाईल, असेही असं सांगण्यात आलं.

मयूर देविदास यांनी जहाजावर नोकरी करण्याचा पर्याय निवडला. सुरुवातीला एजंटने संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात देण्याचा आग्रह धरला. मात्र, व्यवहारात मोठी रक्कम असल्यामुळे, मयूर यांनी पेमेंट सवलतीसाठी विनंती केली. अखेर, दोन्ही बाजूंनी परस्पर सहमतीनं हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याचा निर्णय घेतला.

ऑगस्ट २०२४ च्या मध्यात मयूर यांनी एका एजंटला ₹१,५०,००० रोख स्वरूपात दिले. त्यानंतर, १० सप्टेंबर २०२४ रोजी, NEFT द्वारे ४,००,००० रूपये ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस मयूर यांनी एजंटला ₹१,७८,००० ची अतिरिक्त रक्कम दिली.

सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, एजंटने मयूर यांना माहिती दिली की त्यांची सर्व कागदपत्रं मंजूर झाली आहेत आणि ते जहाजावर प्रवास करण्यास पात्र आहेत.

संबंधित एजंटने त्यांना सांगितलं की, मुंबईला जाऊन पुढील सूचनांची वाट पाहण्यासाठी दहा दिवस तिथं थांबावं लागेल. या कालावधीत, संपूर्ण प्रवास आणि राहण्याचा खर्च तक्रारदारानं स्वतः उचलला, एजंटने कोणतीही मदत केली नाही.

यानंतर, एजंटचा फोन आला ज्यामध्ये तक्रारदाराला विमानानं इस्तंबूलला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.

२९ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी इस्तंबूलला जाण्यासाठी निघालो. मेक्सिकोला पोहोचल्यानंतर, त्यांनी विमानतळावर असलेल्या अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली, मात्र इमिग्रेशन क्लिअरन्स दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीसाठी रोखलं.

अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत मयूर यांचं जॉइनिंग लेटर आणि जहाजाशी संबंधित कोणतंही अधिकृत कागदपत्र अस्तित्वात नसल्याचं आढळलं. त्यामुळे तक्रारदाराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

कागदपत्रांच्या अभावामुळे मेक्सिको विमानतळावर अडवण्यात आल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईला परत पाठवण्यात आले. या घटनेनंतर, मयूर यांनी संतप्त होऊन एजंट आरोपीला जाब विचारला. त्यावर एजंटने परत पाठवण्याची आणि दोन महिने वाट पाहण्यास सांगितलं.

मयूर यांनी दोन महिन्यांनंतर एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने उद्धटपणे बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे, तक्रारदार मयूर यांनी फसवणुकीबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

स्थानिक पोलिसांकडूया प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संधींसाठी सावधगिरी बाळगावी आणि व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्ण खातरजमा करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT