Manikrao Rane  Dainik Gomantak
गोवा

Cash For Job: 'मी सरकारी जॉब मिळवून देईन असे म्हणाला आणि..', माजी सरपंचाने सांगितले 'माणिकराव'चे कारनामे

Manikrao Rane Case: कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणात सध्या पोलिस कोठडीची हवा खाणारा माणिकराव राणे याने डिचोलीतील काहीजणांना जॉब देण्याचे आमिष दाखवून चुना लावला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Scam Manikrao Rane

डिचोली: घर नंबरच्या चौकशीसाठी आला आणि माणिकराव राणे याने माझ्यासह इतरांना फसविले, असा गौप्यस्फोट तक्रारदार तथा वन-म्हावळींगेच्या माजी सरपंच शीतल सावळ यांनी आज केला.

कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणात सध्या पोलिस कोठडीची हवा खाणारा माणिकराव राणे याने डिचोलीतील काहीजणांना जॉब देण्याचे आमिष दाखवून चुना लावला आहे.

माणिकरावने माझ्यासह अन्य चौघांना मिळून २१.५० लाखांना गंडा घातल्याची तक्रार शीतल सावळ यांनी केल्यानंतर डिचोली पोलिसांनी शुक्रवारी माणिकराव राणे याला अटक केली आहे. २०२१ साली मी वन-म्हावळींगेची सरपंच असताना माणिकराव राणे एक दिवस पंचायतीत आला. घर क्रमांक मिळविण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते, अशी चौकशी त्याने माझ्याकडे केली.

बोलता बोलता त्याने, ‘कोणाला सरकारी जॉब हवा असल्यास सांगा. मी जॉब मिळवून देईन.’ असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माझ्या मुलाला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी त्याला पैसे दिले. त्यानंतर पूजा येंडे हिच्यासह इतरांनी सरकारी नोकरीसाठी माणिकरावकडे पैसे दिले, अशी माहिती सावळ यांनी दिली.

नोकरी नाही, अन् पैसेही गेले

माझ्यासह फसवणूक झालेल्या अन्य चौघांनी गेली तीन वर्षे सतत माणिकराशी संपर्क साधला. मात्र, नोकरी नाहीच, उलट त्याने पैसेही परत केले नाहीत. माणिकरावने आपली फसवणूक केल्याचे ठाम मत झाल्यानंतर त्याच्याविरोधात डिचोली पोलिसांत तक्रार करण्यात आली, अशी माहिती सावळ यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT