Amit Palekar, Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Job Scam Controversy: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Opposition leaders claim surveillance amid Goa job scam controversy: ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा म्हणजे ‘व्यापम-२’ ठरावा. या प्रकरणावर बोलल्यास विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्यावर पोलिसांमार्फत पाळत ठेवली जात असल्याचा आरोप विजय सरदेसाई आणि ॲड. अमित पालेकर यांनी आज केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai Amit Palekar Press Conference About Cash For Job

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा म्हणजे ‘व्यापम-२’ ठरावा. या प्रकरणावर बोलल्यास विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज केला. तसेच आपल्यावर पोलिसांमार्फत पाळत ठेवली जात असल्याचा आरोप विजय सरदेसाई आणि ॲड. अमित पालेकर यांनी आज केला.

‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सर्व यंत्रणा अपयशी ठरल्यानंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कॅश फॉर जॉब प्रकरणी ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेस सरदेसाई यांच्याबरोबर काँग्रेसचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, आम आदमी पक्षाचे गोवा राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर उपस्थित होते.

माझ्या फार्म हाऊसवर साध्या वेशातील पोलिस

आमदार सरदेसाई यांनी सांगितले, ‘कॅश फॉर जॉब'' घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार कोण, याचे नाव लवकरच उघड करणार आहोत. मडगावात आम्ही ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने याच विषयावर शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती.

त्यानंतर शनिवारी माझ्या मळकर्णे (सांगे) येथील फार्म हाऊसमध्ये साध्या वेशात पोलिस गेले होते. ते तेथे नक्की काय तपासायला गेले होते, हे मला माहीत नाही. सीसीटीव्हीमध्ये साध्या वेशातील पोलिस आल्याचे स्पष्ट दिसत आहे. विरोधकांना भीती दाखवून त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT