Goa Crime: इतर राज्यातील व्यक्तींमुळे गोव्यात गुन्हे वाढले; मुख्यमंत्री म्हणाले गोवेकरांनी...

येत्या काही दिवसांत तक्रारीसाठी ऑनलाईन सुविधा
CM pramod
CM pramodDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात इतर राज्यातील व्यक्तींमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. ही गुन्हेगारी कमी करायची असेल तर गोमंतकीयांनी प्रशासनाला मदत करणे आवश्यक आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे गोवा प्रशासन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारवाईंचा वेग वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(cm pramod sawant informed Crimes increased in Goa due to persons from other states)

CM pramod
Goa News: रेल्वे विद्युतीकरणामुळे प्रदूषणावर आले नियंत्रण

मिळालेल्या माहितीनुसार आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील गुन्हेगारी वाढली असल्याची अप्रत्यक्ष कबूली देली आहे. याबाबत ते म्हणाले की, गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यास मुख्यत: राज्याबाहेरील व्यक्तींचा सहभाग अधिक आहे.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गोवेकरांनी आता सतर्क राहत प्रशासनाला मदत करणे आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. एखादा संशयास्पद प्रकार घडत असताना नागरिकांनी पोलिसांना कळवल्यास अशा प्रकारांना आळा घालण्यात निश्चित यश येईल असा ही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

CM pramod
Goa Tourist: दर्जेदार पर्यटनासाठी साधनसुविधा आवश्‍यक

येत्या काही दिवसांत ऑनलाईन तक्रारीसाठी अॅपची सुविधा

मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे म्हटले आहे. गोवा सरकार येत्या एक महिन्यात अशा तक्रारींसाठी ऑनलाईन अॅपची सुविधा उपल्बध करुन देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामूळे गोवा प्रशासन अमली पदार्थविरोधातील कारवाई प्रमाणे इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod swant
CM Pramod Sawant
Goa Karnataka border island dispute
CM Pramod Sawant Inquiry Order
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com