Cash For Job Scam Canva
गोवा

Uma Patil Case: 'उमा'कडून दोन बसेस, कार, दुचाकी जप्त! मुलग्यालाही ओढले फसवणुकीच्या धंद्यात; दोन दिवसांत तिसरा गुन्हा नोंद

Cash For Job: वास्को बायणातील उमा पाटील या महिलेच्या कारनाम्यांची व्याप्ती वाढू लागली आहे. काल तिच्याविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Uma Patil Cash For Job

वास्को: पतीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून नादोडा-बार्देश येथील एका महिलेकडून ४ लाख रुपये उकळल्या प्रकरणी उमा पाटील (बायणा- वास्को) हिच्यावर आणखी एक गुन्हा नोंद. दोन दिवसांत तिसरा गुन्हा नोंद. आणखी कारनामे उघडकीस येण्याची शक्यता वास्कोतील नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

वास्को बायणातील उमा पाटील या महिलेच्या कारनाम्यांची व्याप्ती वाढू लागली आहे. काल गुरुवारी तिच्याविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नातेवाईकाला नौदलात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून उमा पाटील हिने बायणातील एका गरीब महिलेकडून १ लाख ७० हजार उकळले होते.

दोन बसेस, दोन कार, दुचाकी जप्त

मूळच्या सुनिता आमोणकर असलेल्या उमा पाटील पूर्वीपासून बायणातीलच रहिवासी आहेत. वास्को पोलिसांनी तिच्याविरुद्ध कारवाई करताना तिच्या दोन बसगाड्या, दोन कार व एक दुचाकी जप्त केली आहे. पोलिस तिच्या अन्य मालमत्तांचाही शोध घेत आहेत.

ऐन पंचवीशीतील असलेल्या आपल्या मुलालाही तिने फसवणुकीच्या धंद्यात ओढल्याचे पोलिस चौकशीत आढळून आले आहे. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिस उमा पाटील हिच्या फसवणूक प्रकरणांची चौकशी करीत आहेत. सध्या तिला व तिच्या मुलग्याला दोन दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT