Pooja Naik Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: '..ते पैसे देण्यास तयार नाहीत, त्यांना न्यायालयात खेचणार'! पूजा नाईकचा खुलासा; IAS देसाईंची नोटीस न मिळाल्याचा दावा

Pooja Naik Cash For Job: देसाईंसह अभियंता उत्तम पार्सेकर यांनाही न्‍यायालयात खेचणार असल्‍याचे या प्रकरणातील मुख्‍य आरोपी पूजा नाईक हिने शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी पाठवलेली कायदेशीर नोटीस आपल्‍याला मिळालीच नाही, असे सांगत देसाईंसह सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) प्रधान मुख्‍य अभियंता उत्तम पार्सेकर यांनाही न्‍यायालयात खेचणार असल्‍याचे या प्रकरणातील मुख्‍य आरोपी पूजा नाईक हिने शनिवारी ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

‘‘सरकारी नोकऱ्यांसाठी लोकांकडून घेतलेले पैसे आपण निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर यांना दिल्‍याचे सांगितल्‍यानंतर देसाई यांनी आपल्‍याला कायदेशीर नोटीस बजावल्‍याचे आपल्‍याला सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून समजले होते. परंतु, ती नोटीस मला अद्याप मिळालेली नाही. आपण दिलेले पैसे परत करा, अशी मागणी आपण अनेकदा त्‍या दोघांकडेही केलेली आहे.

तरीही ते देण्‍यास तयार नाहीत. त्‍यामुळे आपण त्‍या दोघांविरोधात न्‍यायालयात जाणार आहे. या प्रकरणात आपल्‍याला कायदेशीर मदत करण्‍याची तयारी ॲड. अमित पालेकर यांनी दर्शवलेली आहे. त्‍यामुळे लवकरच आपण पालेकरांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया सुरू करणार आहे’’, असे पूजा नाईक हिने सांगितले.

चौदा दिवसांनंतरही सत्‍य गुलदस्‍त्‍यातच!

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कायद्यानुसार (बीएनएसएस) पूजाची चौदा दिवसांत चौकशी करून या प्रकरणातील सत्‍य बाहेर आणले जाईल. गरज पडल्‍यास तिची नार्को चाचणी करण्‍यात येईल, असे क्राईम ब्रांचचे तत्‍कालीन अधीक्षक राहुल गुप्‍ता यांनी सांगितले होते. पण, चौदा दिवस पूर्ण झाल्‍यानंतरही पोलिसांनी या प्रकरणातील सत्‍य जनतेसमोर आणलेले नाही. याबाबत गुप्‍ता यांच्‍याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT