भीषण दुर्घटना! रस्त्याचे काम करताना 11,000 व्होल्टच्या विजेचा धक्का; 8 मजुरांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
Rajasthan road construction accident
Rajasthan road construction accidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. रस्त्याच्या बांधकामाचे काम सुरू असताना ११ हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचा धक्का बसल्याने आठ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रस्त्याचे काम सुरू असताना काळाचा घाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, झुंझुनू जिल्ह्यात काही मजूर रस्त्याच्या बांधकामाचे काम करत होते. याचदरम्यान ११ हजार व्होल्ट क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने मोठी दुर्घटना घडली. विजेचा जोरदार धक्का बसल्याने आठ मजुरांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ६ जण गंभीर झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.