

Gajakesari Rajyog Jupiter Moon conjunction: सिंह राशीत गुरु आणि चंद्र एकाच वेळी उपस्थित राहिल्याने या दोन प्रमुख ग्रहांची युती होणार असून, अत्यंत शुभ मानला जाणारा ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि चंद्राचा हा दुर्मिळ संयोग सर्व राशींच्या जीवनावर प्रभाव पाडणारा ठरेल. विशेषतः मेष, मिथुन, सिंह आणि तुळ या चार राशींसाठी हा राजयोग अत्यंत नशीबवान आणि लाभदायक सिद्ध होणार आहे. या लकी राशीच्या जातकांना करिअरमध्ये प्रगतीसोबतच आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा पाहायला मिळेल.
मेष राशीच्या जातकांसाठी गजकेसरी राजयोग अतिशय शुभ फलदायी ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून आयुष्यात चाललेल्या अडचणींचा आता अंत होईल. कार्यक्षेत्रात नवीन यश आणि सिद्धी प्राप्त होईल, तसेच आर्थिकदृष्ट्याही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीसाठी हा काळ सर्व कामांत यश मिळवून देणारा ठरेल. जर एखादा जुना वाद सुरु असेल तर तो मिटण्याची शक्यता आहे. विशेष करुन मीडिया आणि शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या व्यक्तींना या काळात विशेष धनलाभ आणि मान-सन्मान मिळेल.
गुरु आणि चंद्राची ही युती सिंह राशीतच होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अत्यंत भाग्यशाली ठरेल. सिंह राशीच्या जातकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळून आर्थिक लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होतील; मात्र या काळात आरोग्याची (Health) थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. दुसरीकडे, तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल राहील. नोकरदार वर्गाला पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता असून, कमाईत वाढ झाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. या चारही राशींच्या आयुष्यात हा राजयोग आनंदाचे आणि समृद्धीचे दिवस घेऊन येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.