"नोकरी घोटाळ्यावर बोलणार पण..." पूजा नाईकच्या आरोपांवर मंत्री सुदिन ढवळीकरांनी स्पष्ट केली बाजू

Sudin Dhavalikar job scam statement: या आरोपांवर मंत्री ढवळीकर यांनी अखेर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे
Job scam controversy Goa
Job scam controversy GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या नोकरी घोटाळा प्रकरणात वीजमंत्री आणि मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्यावर 'गोवा फॉरवर्ड'च्या पूजा नाईक यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर मंत्री ढवळीकर यांनी अखेर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. 'कॅश-फॉर-जॉब्स' घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाल्यावर आणि मला अहवाल मिळाल्यावरच मी या विषयावर उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे.

'नोकऱ्या गुणवत्तेच्या आधारावर'

नोकरी घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना मंत्री ढवळीकर यांनी त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली. त्यांनी नमूद केले की, गेली २६ वर्षे मी राजकारणात आहे आणि या काळात मी सांभाळत असलेल्या विविध विभागांमध्ये अनेकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, हे खरे आहे. मात्र, या सर्व नोकऱ्या केवळ गुणवत्तेच्या आधारावर देण्यात आल्या.

"मी कुणालाही पैसे घेऊन नोकरी दिलेली नाही," असे ठामपणे सांगत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. परंतु, त्याच वेळी या घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याने, सद्यस्थितीत अधिक भाष्य करणे त्यांनी टाळले आहे.

समर्थकांच्या 'साकड्यावर' प्रतिक्रिया

नोकरी घोटाळ्यात मंत्री सुदिन ढवळीकर यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या काही समर्थकांनी त्यांच्यासाठी देवाला साकडे घातले होते. याविषयी बोलताना ढवळीकर यांनी कार्यकर्त्यांप्रती आदर व्यक्त केला. ते म्हणाले की, "मी २६ वर्षांपासून पक्षात आहे, आणि माझे पक्षाचे कार्यकर्ते पेडणे ते काणकोणपर्यंत पूर्ण निष्ठेने पक्षाचं काम करतात. मी त्यांचा आदर करतो."

मात्र, अशा प्रकारे देवाला साकडे घालण्याचा सल्ला आपण कुणालाही दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Job scam controversy Goa
Job Scam Case: नोकरी घोटाळ्या प्रकरणी पूजा नाईकची सीबीने केली 5 तास कसून चौकशी!

'आप'च्या नेत्याला अप्रत्यक्ष टोला; 'त्यांनीच देवासमोर खरं बोलावं'

काही दिवसांपूर्वी 'आप'चे नेते अमित पालेकर यांनी मंत्री ढवळीकरांना आव्हान दिले होते की त्यांनी समोर येऊन देवासमोर खरं बोलावे. या टीकेला उत्तर देताना ढवळीकर यांनी पालेकरांचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे सुनावले आहे.

ढवळीकर म्हणाले, "मला देवासमोर येऊन काही सांगण्याची गरज नाही. उलट, त्यांनीच देवासमोर उभं राहून खरं बोलावं आणि देव त्यांना सद्बुद्धी देवो," असे म्हणत ढवळीकर यांनी पालकरांचे आव्हान खोडून काढले आहे. एकूणच, सध्या ढवळीकर यांनी नोकरी घोटाळ्याच्या आरोपांवरील उत्तरे चौकशी अहवाल मिळेपर्यंत राखून ठेवली आहेत, तर विरोधकांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com