Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa Molestation Case: प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

समन्स जारी: आज चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांकडून निर्देश

दैनिक गोमन्तक

Goa Molestation Case

गोवा विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीला कक्षात बोलावून तिचा विनयभंग व लैंगिक छळ केल्याप्रकरणी सहाय्यक प्राध्यापकाविरोधात महिला पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी त्याच्या निवासी पत्त्यावर नोटीसवजा समन्स बजावून उद्या १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. महिला पोलिस स्थानकात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

पीडितेच्या वडिलांनी महिला पोलिस स्थानकात काल गोवा विद्यापीठातील सहाय्यक प्राध्याप श्रीराम पदियाल विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्राध्यापकाने विद्यार्थिनीला कक्षात बोलावून व तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने ही बाब पालकांना सांगितली होती. पालकांनी विद्यापीठ निबंधकांकडे तक्रार केली, मात्र विद्यापीठाकडून कारवाई न झाल्याने तिच्या वडिलांनी एका आमदाराला माहिती दिली. या आमदाराने मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून चौकशीची मागणी केली.

विद्यापीठ परिसरात रंगली चर्चा

प्राप्त माहितीनुसार आंध्रप्रदेशमधील सहाय्यक प्राध्यापक श्रीराम पदियाल हे गोवा विद्यापीठात २०१८ साली रूजू झाले होते. ते वाणिज्य शाखेचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एम. कॉम व पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. प्राध्यापकाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे विद्यापीठ विद्यार्थ्यांत आज दिवसभर चर्चा सुरू होती. पीडित विद्यार्थिनीसोबत ज्या विद्यार्थिनी या प्राध्यापकाच्या केबिनमध्ये घटनेच्या आदल्या दिवशी गेल्या होत्या, त्यांच्या जबान्या नोंदवण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT