Margaon Municipality Dainik Gomantak
गोवा

Margo News : गहाळ सोपो फाईलप्रकरणी शॅडो कौन्सिलची लेखी तक्रार ; ‘एफआयआर’ची मागणी

मडगावच्या नागरिकांना विश्र्वासात न घेता शहराचा जो मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margo News : सासष्टी,: मडगाव नगरपालिकेतील गहाळ सोपो फाईलप्रकरणी शॅडो कौन्सिलने नगरपालिका प्रशासनाच्या संचालकांकडे लेखी तक्रार दिली असून यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या गहाळ फाईलमुळे नगरपालिकेला अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचेही तक्रारीत म्हटले असल्याचे शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी गुरुवारी (ता.५) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

या पत्रकार परिषदेला आर्किटेक्ट कार्लोस ग्रासियस, मारिया दो कार्मो, इफ्तियाज सय्यद, लालन पार्सेकर व इतर उपस्थित होते.

नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे नगरपालिकेप्रति सौम्य धोरण असल्यामुळे मडगाव नगरपालिकेत अनेक घोटाळे सुरू आहेत, असेही संचालकाच्या निदर्शनास आणून दिले आहे. जुलै २०२२ पासून सोपो गोळा करण्यासाठीचा लिलाव घेण्याचे प्रयत्न केले जात नाहीत, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मडगावच्या नागरिकांना विश्र्वासात न घेता शहराचा जो मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे, त्यातही काही तरी काळेबेरे आहे. २००९ साली मडगावचे आमदार जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ४० लाख रुपये खर्चून सीडीपी तयार करण्यात आला होता.

तो मंजूर करण्यासाठी नगरपालिकेवर दबाव टाकण्यात आला होता. मात्र, त्यात असलेल्या अनेक दोषांमुळे तो जीसुडाकडे परत करण्यात आला होता, असेही कुतिन्हो यांनी सांगितले. केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी मडगाव शहराची वाट लागल्याचे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.

‘सोपो’बाबत घोळ

नगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीद्वारे कळते की दर महिन्याला ‘सोपो’मुळे ४ ते ५ लाख रुपयांचा महसूल गोळा केला जातो. मात्र, सोपो गोळा करण्यासाठी जो कर्मचारी वर्ग आहे त्यांचा पगार यापेक्षा जास्त दाखवला जात आहे.

शिवाय नगरपालिका कचेरीतून रोकडही चोरली जाते. एरव्ही कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्च वगळून नगरपालिकेच्या तिजोरीत ‘सोपो’द्वारे ६.४२ लाख रुपये जमा व्हायला पाहिजे होते, असे कुतिन्हो यांनी सांगितले.

२८ फेब्रुवारी २०२३ रोजी नगरपालिकेने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी सोपो गोळा करण्यासाठी कमीत कमी ७७ लाख रुपयांच्या निविदा मागवल्या होत्या. बोलीसाठी १४ मार्च २०२३ ही तारीख निश्र्चित करण्यात आली होती.

मात्र, कोणीही निविदा न भरल्यामुळे लिलाव झाला नाही. निविदा परत मागविण्याऐवजी फाईलच गहाळ झाली. यामागे पालिकेतील कुणाचा तर स्वार्थ आहेे. - सावियो कुतिन्हो,

निमंत्रक, शॅडो कौन्सिल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT