Carnival Festival Dainik Gomantak
गोवा

Carnival Festival: गोव्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च कार्निव्हल फेस्टिवलची धूम

दैनिक गोमन्तक

अनादी काळापासून, गोवा हे पार्टीचे (Goa Party) ठिकाण म्हणून ओळखले जाते, तुम्ही तिथे मुक्त पणाने श्वास घेऊ शकता, आणि तुम्ही विविधतेने रंगलेल्या गोव्याच्या सनांचा देखील आनंद घेऊ शकता. कार्निव्हलच्या काळात तुम्ही कधी गोव्याला भेट दिली आहे का? जर नसेल, तर तुम्हाला नक्कीच भेट द्यायला हवी आहे.

वार्षिक कार्निव्हल दिवसांमध्ये गोवा खूप मजेदार ठिकाण आहे. पणजी आणि वास्को दा गामा () सारखी शहरे या काळात पूर्णपणे सजलेली असतात आणि उत्सवांच्या कर्कश ऊर्जेने भरलेली असतात.

गोवा कार्निव्हल, ज्याला व्हिवा कार्निव्हल (Carnival Festival) असेही म्हणतात, दरवर्षी गोव्यात हे फेस्टीव्हल 4 दिवस चालतात. हा सण ख्रिश्चन धर्माच्या (Christianity Festivals) लेंटच्या पवित्र कालावधीची सुरूवात करते आणि देशभरातील पर्यटकांसाठी हे एक मोठे आकर्षण ठरले आहे. यावर्षी हा कार्निव्हल 26 फेब्रुवारीला पणजी, 27 फेब्रुवारी रोजी मडगाव, 28 फेब्रुवारी रोजी वास्को आणि 1 मार्चला म्हापसा येथे होणार आहे.

18 व्या शतकात पोर्तुगीजांनी गोव्यात (Goa) कार्निव्हलची ओळख करून दिली आणि तो अजूनही गोव्यात आवडीने साजरा केला जातो. पूर्व-ख्रिश्चन युगात, असे मानले जात होते की 'अंधारातून प्रकाशात संक्रमण करणे' म्हणजे हा सण आहे. तेव्हापासून हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात म्हणून कार्निव्हल साजरा केला जातो.

लेंट मध्ये 40 दिवसांचा उपवास आहे, ज्यामध्ये मांसाहार आणि अल्कोहोलचे सेवन करायचे नसते. त्यावेळी येशूंनी वाळवंटात उपवास केला होता, आणि म्हणूनचं त्यांच्या स्मरणार्थ लेंट पाळला जातो. लेंट अॅश बुधवारपासून सुरू होतो आणि इस्टर संडेच्या आदल्या दिवशी संपतो. तो दिवस ज्या दिवशी येशूचे पुनरुत्थान झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पणजीत मांडवी पुलावर पुन्हा अपघात, तिघेजण जखमी

हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

Goa Dairy: ..अन्यथा संप पुकारु! थकीत महागाई भत्त्यासोबत इतर मागण्यांवरुन 'गोवा डेअरी’च्या कामगारांचा इशारा

Cutbona Jetty: 'मतदारसंघात आम्हालाच बोलावले जात नाही!' कुटबणबाबत क्रुझ सिल्वांचा हल्लाबोल

Goa BJP: 'पक्ष व सरकार यांच्यात समन्वय पाहिजेच'; गोवा भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची तंबी

SCROLL FOR NEXT