Goa Carnival Festival Dainik Gomantak
गोवा

वास्कोत आजपासून कार्निव्हल उत्सव

जयंत तारी: विविध स्पर्धा, तियात्र, चित्ररथ मिरवणूक

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोत कार्निव्हल उत्सव 27 रोजी सुरू होत असून 28 रोजी दुपारी 3 वाजता चित्ररथ मिरवणुकीचे उद्दघाटन प्रमुख पाहुण्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटीयाल यांच्या उपस्थितीत सुरू होणार असल्याची माहिती कार्निव्हल समितीचे अध्यक्ष जयंत तारी यांनी दिली. यावेळी सरचिटणीस फ्रान्सिस्को रॉड्रिग्ज, खजिनदार दिनीज डिमेलो उपस्थित होते.

तारी म्हणाले, वास्को कार्निवाल उत्सव मुरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी आस्वाद घ्यावा. कोविड-19 नियमांचे पालन करावे.

27 रोजी मुरगाव नगरपालिका इमारती समोरील व्यासपीठावर वास्को कार्निव्हल उत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. नंतर 6.30 वाजता लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा कनिष्ठ व उपकनिष्ठ अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे.

खेळ तियात्र कार्यक्रम खारीवाडा मांगोरहील, बायणा, वाडेतळे, चिखली, व्हॉळांत व इतर ठिकाणी होणार आहे. रात्री 8 वाजता कोकणी सांगीतिक कार्यक्रम नॉर्मन कार्दोज सादर करणार

आहे. 28 रोजी दुपारी 3 वाजता कार्निव्हल मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. सदर मिरवणूक वास्को सेंट अँड्र्यू चर्च ते स्वतंत्रपथ मार्गे वास्को रेल्वे स्थानकापर्यंत चित्ररथ मिरवणूक होणार आहे. रात्री साडेसात वाजता पॉपस्टार एल्विस गोईस यांचा कार्यक्रम.

1 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता स्थानिक नृत्य कलाकारांतर्फे नृत्य प्रदर्शन. 7 वाजता ‘वोलू’ कोकणी संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नंतर रात्री 8 वाजता ब्लॅक शेड बॅण्ड या संगीत कार्यक्रमाने कार्निव्हल उत्सवाची सांगता होणार आहे.

अशी आहे कार्निव्हल समिती

मुरगावचे गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक (चित्ररथ मिरवणूक प्रमुख), मुरगावचे अबकारी निरीक्षक मुकुंद गावस (संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुखपदी), मूरगाव नगरपालिकेचे अभियंते आगस्तो मिस्किता (साधन सुविधा प्रमुखपदी), वाहतूक पोलीस निरीक्षक जितेंद्र नाईक (वाहतूक व्यवस्था प्रमुख), पोलिस निरीक्षक नितीन हळणकर (कायदा सुव्यवस्था प्रमुख), अग्निशमन दलाचे फ्रान्सिस्को मेंडीस (आग प्रतिबंधक प्रमुख), डॉक्टर परेश लवंदे(आरोग्य विभाग), मूरगाव नगरपालिका कनिष्ठ अभियंता शंभू कुडणेकर (चहा फराळ व्यवस्था प्रमुखपदी), वीज विभाग सहाय्यक अभियंता संजीव म्हाळसेकर (वीज विभाग प्रमुख) तर महेश कुडाळकर सेनिटेशन व हायजीन प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT