Goa Assembly 2022 Carlos Almeida BJP MLA from Vasco has resigned

 

Dainik Gomantak

गोवा

कार्लोस आल्मेदा यांनी 'आमदारकीचा' दिला राजीनामा..

वास्को मधील भाजपचे आमदार कार्लोस आल्मेडा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Election: राज्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण (Politics) सुरु असून, अनेक आमदारांनी (MLA) आपले पक्ष सोडले आहेत. त्यातच आता वास्कोमधील भाजपचे आमदार कार्लोस आल्मेदा (BJP's Vasco MLA Carlos Almeida) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

जवळपास सर्वच पक्ष त्याच्या संपर्कात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कार्लोस हे राजीनामा देणारे भाजपचे गोव्यातील (Goa BJP) दुसरे आमदार आहेत. कार्लोस आल्मेदा आता कोणतं पाऊल उचलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

'भाजपला मी नको आहे. त्यांनी मला बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. ते म्हणतात की मी आजारी आहे आणि निवडणूक जिंकण्यास सक्षम नाही,” पुढे ते म्हणाले की त्यांनी टीएमसी नेत्यांची भेट घेतली आहे परंतु कोणत्या पक्षात सामील व्हायचे याचा निर्णय आज रात्री समर्थकांच्या मुख्य टीमशी सल्लामसलत करून घेतला जाईल.

पर्रीकरांचे निष्ठावंत त्यांच्या निधनानंतर संपत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कार्लोस यांच्या राजीनाम्यामुळे 40 सदस्यीय गोवा विधानसभेचे संख्याबळ 33 वर पोहोचले आहे. कोर्टालिमच्या आमदार एलिना सालढान्हा यांच्यानंतर राजीनामा देणारे कार्लोस हे दुसरे भाजप आमदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT