Ponda Fire News Dainik Gomantak
गोवा

Ponda Fire News: जीव वाचला पण संसाराची झाली राख, शॉर्टसर्किटमुळे घर जळून खाक; दाम्पत्याची व्यथा

Ponda Fire: मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती फोनवरून च्यारी कुटुंबाला दिली. त्यानंतर त्यांनी त्वरित घराकडे धाव घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: गाळवाडा - प्रियोळ येथील एका घराला लागलेल्या आगीत घरासह आतील चीजवस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

गाळवाडा - प्रियोळ येथील दामोदर नाईक यांचे हे घर असून या घरात संदेश च्यारी आणि गीता च्यारी हे दाम्पत्य केअरटेकर म्हणून आपल्या दोन मुलांसमवेत राहतात. गुरुवारी ही दुर्घटना घडली त्यावेळी घरात कुणीच नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती फोन वरून च्यारी कुटुंबाला दिली. त्यानंतर त्यांनी त्वरित घराकडे धाव घेतली.

अग्निशामक दलाला कळविल्यानंतर दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली; पण हे घर उंचावर असल्याने दलाच्या जवानांना तेथे पोचेपर्यंत बरेच सायास करावे लागले. तोपर्यंत स्थानिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले; मात्र आग आणखीनच भडकल्यामुळे घराचे छप्पर तसेच घरगुती वस्तू, सोन्याचे दागिने, पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. स्थानिक पंचायतीने या घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित शर्मा पाकिस्तानचा कर्णधार? LIVE सामन्यात ब्रॉडकास्टरची मोठी चूक Watch Video

Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेमात मिळाला धोका, संतापलेल्या प्रेयसीने ब्लेडने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापला

ISL Football: जिगरबाज एफसी गोवाची बरोबरी, पिछाडीवरून गतविजेत्या मोहन बागानला 1-1 असे रोखले

Goa Virgal History: नौदल युद्ध ते गोधन रक्षण! वीरगळांवरील शिल्पांतून उलगडतो गोव्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास

Sexual Harassment: 'इन्स्टाग्राम'वरून मैत्री करून युवतीला फसविणारा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी; तपास सुरू

SCROLL FOR NEXT