Caranzalem Petrol Pump Fight Dainik Gomantak
गोवा

615 रुपयांचे पेट्रोल गेले कुठे? करंझाळे येथील पेट्रोल पंपवर फ्री स्टाईल मारामारी, प्रकरण पोचले पोलिसांपर्यंत

Caranzalem Petrol Pump Fight: करंजाळे येथील पेट्रोल पंपवर मोटारसायकमध्ये ६१५ रुपयांचे पेट्रोल कसे घातले, यावरून मारामारी झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी : करंजाळे येथील पेट्रोल पंपवर मोटारसायकमध्ये ६१५ रुपयांचे पेट्रोल कसे घातले, यावरून मारामारी झाली. दुचाकीमालकाच्या म्हणण्यानुसार, मोटारसायकलमध्ये तेवढे पेट्रोल घालताच येत नाही, तर पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्याने ६१५ रुपयांचे पेट्रोल मोटारसायकलमध्ये घातले होते.

६१५ रुपयांचे पेट्रोल नेमके कुठे गेले? हा प्रश्न इतका गंभीर बनला, की त्यातून मारामारी सुरू झाली. पेट्रोल टाकीत गेले की हवेत उडाले, यावरून पुढे जोरदार वाद रंगला. काहींनी मीटर व्यवस्थित असल्याचा दावा केला, तर काहींना बाईकची टाकी अचानक ‘मिनी ट्रक’ क्षमतेची वाटू लागली. परिस्थिती एवढी तापली, की कर्मचाऱ्यांना पेट्रोलपेक्षा वातावरणच अधिक ज्वलनशील वाटू लागले.

प्रकरण पोचले पोलिसांपर्यंत

वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या कर्मचाऱ्यांनाही यावेळी मारामारीला सामोरे जावे लागले. या प्रकारानंतर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता पेट्रोलसोबत संयम आणि धैर्याचाही अतिरिक्त साठा ठेवावा लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

६१५ रुपयांचे पेट्रोल नेमके कुठे गेले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आली असून परिसरात या घटनेची चर्चा चांगलीच रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT