Carambolim Canva
गोवा

Carambolim: कुव्हाळ– कांतोर मानशेची दारे गायब! नदीचे पाणी घेण्यासाठी धक्कादायक प्रकार; शेतीसह परिसर धोक्यात

Carambolim Khajan Farming Issue: कुव्हाळ – कांतोर मानशेची दारे काढून त्याचा जागी लाकडी फळी लावून नदीचे पाणी घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Sameer Panditrao

Carambolim farming land flooding

तिसवाडी: करमळी येथील कुव्हाळ – कांतोर खाजन शेतीत पुन्हा नियमांची पायमल्ली करण्याचा प्रकार घडला. कुव्हाळ – कांतोर मानशेची दारे काढून त्याचा जागी लाकडी फळी लावून नदीचे पाणी घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संपूर्ण शेतीत पाणी भरले असून पाण्याची पातळी वाढून सभोवतीच्या परिसरातील घरांसाठी धोका निर्माण झाला आहे.

हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून होत असल्याने अजित नाईक या करमळी येथील रहिवाशाने सांगितले. त्याने व्हिडिओ काढून व्हायरलही केला. नाईक यांचे घर परिसरातच स्थित असल्याने पाण्याची पातळी वाढून त्यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. व्हिडिओत त्यांनी मानेशवर जाऊन तेथे दारेच नसल्याचे दाखवले आहे. यासंदर्भात जाब विचारली असता तेथे उपस्थित कामगारांना याचे उत्तर देता आले नाही.

अतिरिक्त पाण्यासाठी दुसरा मार्ग

कुव्हाळ – कांतोर येथे बांध बांधून अखेर पूर्ण झाल्यानंतर शेतात पाणी येण्याच्या समस्येवर तोडगा काढला गेला, असे वाटत होते, परंतु ही आशा फोल ठरली असून मानशेच्या ठेकेदारांनी अतिरिक्त पाणी घेण्यासाठी दुसरा मार्गा शोधून काढला. वारंवार हे होत असल्याने ठेकेदारांना प्रशासनाची भीती राहिलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे. यात टेनंट समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या भूमिकेवर देखील संशय झाला आहे, कारण दारे काढल्यानंतर प्रथम पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंद करण्याची सूचना मामलेदार कार्यालयाकडून दिली गेली आहे.

अजित नाईक,रहिवासी, करमळी

कायद्याचा बडगा पडल्याशिवाय हा प्रकार काही थांबणार नाही. कुव्हाळ – कांतोर मानशेची दारेच गायब केली असून शेतीत पाणी भरले आहे. त्याशिवाय पाण्याची पातळी वाढून आमच्या घरापर्यंत पोहोचली आहे. याची दखल प्रशासनाने घेऊन संबंधितांवर कारवाई कारवाई होणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT