Neura: शेती बुडाली आता घरे तरी वाचवा! नेवरावासीयांचा टाहो; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजी

Neura River Problem: नेवरा येथील खाजन शेतीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आता नदीचे पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचू लागले आहे.
Neura river water damage to Khazan fields and homes
Flooding from Neura river affecting Khazan fields and propertiesDainik Gomantak
Published on
Updated on

Neura river water damage to Khazan fields and homes

तिसवाडी: नेवरा येथील खाजन शेतीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आता नदीचे पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचू लागले आहे. परिणामी अनेकांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच यंदा देखील शेती करता येणार नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याने पुन्हा एकदा महसूल खात्याकडे बोट दाखवण्यात आले आहे.

खाजन शेतीत नदीचे पाणी येऊन शेती बुडविण्याचा प्रकार हा नित्याचे झाल्याने हा थांबण्याएवजी वाढत चालला आहे. त्यामुळे महसूल खाते खास करून तिसवाडी मामलेदार कार्यालय काय करत असल्याचा सवाल लोक विचारत आहे.

खात्याकडून आश्वासने दिली जात असली तरी ती कागदा पुरती मर्यादित असल्याची प्रचिती आली आहे. गेल्या वेळी वृत्तपत्रांनी प्रकाश टाकल्यानंतर तिसवाडी मामलेदार कार्यालयाला जाग आली होती. त्यानंतर मानशेच्या ठेकेदारांना नोटीस बजावून पाणी सुखवण्यात आले होते.

Neura river water damage to Khazan fields and homes
Nevra Grande: नेवरा येथे खाजन शेतीत पुन्हा पाणी! नाराज शेतकऱ्यांची प्रशासनावर जोरदार टीका

सध्या नदीचे पाणी नेवरा पंचायत घरापर्यंत पोहोचल्याने खुद्द पंचायत मंडळ काय करते, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. नदीच्या पाण्यात बुडालेली खाजन शेती.

नदीचे पाणी आमच्या घरापर्यंत पोहोचल्याने चिंता वाढली आहे. ही समस्या आता नेहमीची झाल्यात जमा झाली. आम्ही कोणाकडे जाऊन तक्रार करावी हेच कळात नाही. कारण वारंवार तक्रारी देऊनही काहीही होत नसल्याने याची सवयी झाली आहे.

वैशाली नाईक, नेवरा

खाजन बुडण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने यावर तोडगा काढण्यासंदर्भात तिसवाडी मामलेदारांना सूचना दिल्या आहेत. याची खबरदारी महसूल खात्याने घ्यावी, दा समस्येमुळे शेती करणे अशक्य होईल.

रामराव वाघ, अध्यक्ष, खाजन ॲक्शन समिती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com