Zuari Car Accident Dainik Gomantak / Gomantak TV
गोवा

Goa Zuari Car Accident : झुआरी पुलावरुन कोसळलेली कार 12 तासांनंतर बाहेर काढली

आता काळ्या रंगाची डस्टर कार बाहेर काढण्यात आली आहे.

आदित्य जोशी

पणजी : झुआरी पुलावरुन काल बुधवारी रात्री बाजूची रेलिंग तुटल्याने एक कार प्रवाशांसह नदीत कोसळून अपघात झाला. ही अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यात नौदलासह शोधकार्यात गुंतलेल्या यंत्रणांना यश आलं आहे. काल रात्री अपघातानंतर झुआरी पुलावर शोधकार्य सुरु होतं यासाठी नौदलाची मदतही घेतली जात होती. अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचार्‍यांसह वेर्णा आणि आगशी पोलिसांकडून शोधकार्य सुरु होतं. आता काळ्या रंगाची डस्टर कार बाहेर काढण्यात आली आहे.

क्रेनच्या साहाय्याने ही डस्टर कार बाहेर काढण्यात आली आहे. कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचं हाती आलेल्या दृष्यांवरुन स्पष्ट दिसत आहे. या कारमध्ये मृतदेह दिसत असल्याची माहिती आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील कुणीही या अपघातातून वाचू शकलं नसल्याची माहिती आहे. कारला फेरीबोटमध्ये ठेवण्यात आलं असून आता कारमधील मृतदेह बाहेर काढून त्यांना उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉ रुग्णालयात पाठवलं जाणार आहे. सकाळपासूनच याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

झुआरी पुलावर रात्रीपासून अपघातग्रस्त कारसाठी शोधकार्य सुरू होते मात्र काळोख असल्याने शोधकार्य सुरू ठेवण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान तटरक्षक दल आणि नौदल डायव्हर्सशी संपर्क साधण्यात आला होता. हे वाहन पणजीकडून मडगावच्या दिशेने येत होते. या वाहन चालकाने पुलावर ब्रेक मारल्याने त्याच्या खुणा रस्त्यावर दिसत असून ती उजव्या बाजूला वळल्याच्याही खुणा आहेत. आता ही अपघातग्रस्त कार बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Attacks On Police: '..उद्या हे गुन्हेगार पोलीस स्थानकांत घुसून हल्ला करतील', कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा LOP युरींचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; चवथीला नारळाच्याच पोटल्या द्या ना!

Goa Crime: खंडणीखोर 'वॉल्‍टर गँग'च्या म्‍होरक्‍याला अटक! मुंगूलमध्ये झाला होता खुनी हल्ला; गन आणि गोळ्या जप्त

Goa Education Loan: गोव्यात 481 कोटींची शैक्षणिक कर्जे थकीत, 5108 खाती NPA मध्‍ये; केंद्र सरकारचा अहवाल

Goa Rain: 'तिलारी' धोकादायक पातळीवर! पूर, पडझड, वाहतुकीची कोंडी! गोव्यात पावसाचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT