Varca Accident Death Dainik Gomantak
गोवा

Varca Accident Death: वार्कात कारची मोटरसायकलला धडक, एकाचा जागीच मृत्यू

अशित साहा हा युवक वासवाडो बाणावली येथील रहिवासी असून तो फ्लिपकार्टमध्ये काम करत होता.

सुशांत कुंकळयेकर

Varca Accident Death: वार्का-नोवांगुळी येथे बुधवारी मध्यरात्री इनोव्‍हा कारने दुचाकीला धडक देत पलायन केले. या धडकेत दुचाकीचालक अशित साहा (31) याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पलायन केलेल्‍या इनोव्‍हा कारची एक नंबरप्‍लेट अपघात स्‍थळी पडली होती. त्‍या नंबरप्‍लेटच्‍या आधारे कोलवा पोलिसांनी सर्व पोलीस यंत्रणेला सतर्क करण्‍यात आले. आणि पहाटे फाेंडा येथे या इनोव्‍हा कारच्‍या चालकाला ताब्‍यात घेण्‍यात आले. सदर इनोव्‍हाचा ड्रायव्‍हर हा बेळगाव येथील असून राघवेंद्र साळुंखे असे त्‍याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेबारा वाजता वार्कातील नोवांगुळी परिसरात रस्त्यावर हा अपघात झाला. अशित साहा हा युवक वासवाडो बाणावली येथील रहिवासी असून तो फ्लिपकार्टमध्ये काम करत होता.

अशित साहा रात्री वार्काच्या दिशेने जात असतानाच मागाहून भरधाव वेगाने येणार्‍या इनोव्हा कारने त्याला ठोकर दिली. अपघातानंतर सदर कारचालकाने कारसह पलायन केले. कारने दिलेली धडक एवढी भयानक होती की, दुचाकीचालक रस्त्यावर पडला व फरफटत गेला.

अपघाताची माहिती मिळाल्यावर कोलवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT