Anjuna Car Accident Dainik Gomantak
गोवा

Anjuna Car Accident: हणजुणेत महाराष्ट्रातील कारची दोन दुचाकींना धडक; ग्रामस्थांना कारमध्ये आढळले अमली पदार्थ?

कारचालक नशेत असल्याचा संशय; कारसह दोन्ही दुचाकींचे नुकसान

Akshay Nirmale

Anjuna Car Accident: उत्तर गोव्यातील हणजुणे येथे एका अपघातात एका कारने दोन दुचाकींनी उडवले आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. तथापि, कारसह दोन्ही दुचाकींचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या कारमध्ये ग्रामस्थांना अमली पदार्थसदृश्य वस्तू आढळून आली आहे.

या अपघातातील कार महाराष्ट्रातील नोंदणीकृत आहे. या वॅगन कारने हणजुणे येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकींनी धडक दिली. या अपघातावेळी पार्किंगमध्ये फारशी वर्दळ नव्हती. तसेच पार्क केलेल्या दुचाकींशेजारीही कुणीही नव्हते.

त्यामुळे सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, कारचा चालक नशेत असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. कारण कारमध्ये सीटवर ग्रामस्थांना अमली पदार्थ सदृश्य वस्तू आढळून आली आहे.

या कारच्या अपघाताची आणि या पदार्थाची छायाचित्रेही सोशल मीडियातून शेअर झाली आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत गुन्हा दाखल झाला आहे किंवा नाही, हे अद्याप कळलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT