Anjuna Illegal Shacks
Anjuna Illegal ShacksDainik Gomantak

Anjuna Illegal Shacks: हणजुणे किनाऱ्यावरील बेकायदेशीर शॅक्स हटविल्या

पंचायतीची कारवाई
Published on

Anjuna Illegal Shacks: उत्तर गोव्यातील हणजुणे येथील समुद्र किनाऱ्यावरील बेकायदा शॅक्स गुरूवारी हटविण्यात आल्या. हणजुणे पंचायतीनेच ही कारवाई केली.

खासगी शॅक ऑपरेटर्सना पंचायतीने शॅक हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तशी लेखी नोटीसही दिली होती. पर्यटनाशी निगडीत सर्व बेकायदा उपक्रम थांबवावेत, आणि इतरही बेकायदा कृत्यांवर बंदी घालावी, असे पंचायतीने म्हटले होते.

Anjuna Illegal Shacks
Russian drowns at Keri beach: रशियन नागरिकाचा केरी बीच येथे बुडून मृत्यू, मायदेशी परतण्यापूर्वी काळाचा घाला

किनारी भागात सुरू असलेले बहुतेक शॅक्स व आस्थापनांकडे पर्यटन खात्याचा तात्पुरता परवाना असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Mumbai High Court Goa Bench) मंडळाला सर्व शॅक्स व आस्थापनांच्या परवान्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.

ज्यांच्याकडे हा परवाना नाही, त्यांचे व्यवसाय त्वरित बंद करण्याचा आदेशही दिला आहे. या शॅक्सवर संगीत पार्ट्यांचे आयोजन केले जात असते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत ज्यांच्याकडे व्यवसायाचा परवाना नसेल, त्यांचे शॅक्स तसेच आस्थापने बंद करण्याची जबाबदारी उत्तर गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांची असेल. या परवान्याची प्रक्रिया पूर्ण करून प्रदूषण मंडळाने त्याला संमती दिल्यावरच व्यवसाय सुरू करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com