Chorla Car Accident Dainik Gomantak
गोवा

Chorla Car Accident: चोर्ला घाटात दरीत कोसळली कार; गाडीतील तिघांना वाचविण्यासाठी मध्यरात्री राबवली मोहिम...

फायरब्रिगेडने केली प्रयत्नांची शर्थ

Akshay Nirmale

Chorla Ghat Car Accident: कर्नाटक-गोवा यांना जोडणाऱ्या चोर्ला घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात बॅलेनो कार थेट दरीत कोसळली. या कारमध्ये तिघेजण अडकून पडले होते.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन केंद्रातील जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ऐन मध्यरात्री बचाव मोहिम राबवत अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून या तिघांचाही जीव वाचला आहे.

अंजुना धरण परिसरात ही घटना घडली. ड्रायव्हरचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. रात्री १२ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाला या अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर वाळपई अग्निशमन दलातील एस. के. गावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

बाबुराव गवस, सुधाकर गावकर, सोमनाथ गावकर, उमेश गावकर, फाती कलमिसकार यांचा या पथकात समावेश होता.

स्पॉटलाईट आणि दोरखंडाचा वापर करत अग्निशमन दलाच्या जवांनांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही वाचवले. त्यांना सुखरूप बाहेर काढले आणि वर आणले. कारमधील तिघेही प्रवासी जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT