Bicholim Car Accident Dainik Gomantak
गोवा

Bicholim Accident: काळ आला होता पण..! खोल दरीत कार कोसळूनही तिघे युवक सुखरूप

Bicholim: डिचोली-साखळी रस्त्यावरील कारापूर येथे एक कार रस्त्यापासून जवळ असलेल्या खोल दरीत कोसळली

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: काळ आला होता; पण वेळ आली नव्हती. या म्हणीचा प्रत्यय आज डिचोलीत आला. डिचोली-साखळी रस्त्यावरील कारापूर येथे एक कार रस्त्यापासून जवळ असलेल्या खोल दरीत कोसळली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळताना कारचालकासह कारमधील तिघे युवक सुखरूप बचावले.

या अपघातात बचावलेले तिघेही युवक होंडा-सत्तरी येथील असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर तिन्ही युवकांनी भीतीने घटनास्थळावरून पलायन केले. हा अपघातात कारापूर येथील ‘ग्रीन एकर्स’ परिसरात अपघात प्रवण क्षेत्रात घडला.

यासंबंधीची माहिती अशी की, होंडा येथील तिघेजण कारमधून डिचोलीच्या दिशेने जात होते. कारचे टायर बदलण्यासाठी डिचोली येथे जात असताना हा अपघात घडला. कारापूर-तिस्कहून काही अंतरावर असलेल्या उतरणीवर चालकाचे नियंत्रण गेल्याने कार डाव्याबाजूने रस्त्याबाहेर जाऊन दरीत कोसळली.

ही कार एका झाडाच्या फांदीला अडकून राहिली. तसेच त्याठिकाणी असलेल्या वीज खांबाला कारची धडक बसली असती, तर अनर्थ घडला असता. अपघातानंतर सायंकाळीच कार अपघात स्थळावरून हलविण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT