Car Accident in Panjim  Dainik Gomantak
गोवा

अपघातांचं सत्र सुरुच, रायबंदरजवळ कार खाडीत पडली

अपघाताचं कारण अस्पष्ट, कारचं मोठं नुकसान झाल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेलं अपघातांचं सत्र काही संपताना दिसत नाही. पणजीजवळच आज पुन्हा एक अपघात पाहायला मिळाला आहे. पणजी-रायबंदर मार्गावर कारला अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर ही कार खाडीत पडली असून चालकाला किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे.

दिवजा सर्कलजवळच पणजी-रायबंदर मार्गावर शनिवारी दुपारी एका कारला अपघात झाला आहे. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघातानंतर कार खाडीत पडली. अपघातात कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून चालकाला किरकोळ इजा झाल्याची माहिती आहे. मात्र या अपघाताचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

खाडीमध्ये पडलेल्या कारमधून चालकाला बाहेर काढण्यात आलं असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात कारच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघात झाला तेव्हा कार वेगात होती का किंवा अन्य कारणामुळे अपघात झाला याचा तपास केला जाणार आहे. गेल्या काही दिवसात गोव्यात अपघात वाढले असून नवीन मोटार वाहन कायद्याची अमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT