Car Accident in Mollem Dainik Gomantak
गोवा

मोले येथे तीन‌ वाहनांमध्ये विचित्र अपघात

सुकतळी - मोले येथील कारच्या अपघातात कर्नाटकमधील एकाचा मृत्यू

आदित्य जोशी

पणजी : सुकतळी - मोले येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात पाहायला मिळाला आहे. या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एका प्रवाशाचा मृत्यूही झाला आहे. विनय देसाई (35, विजापूर, कर्नाटक) असं या मृत व्यक्तीचं नाव असून कारचंही अपघातात नुकसान झालं आहे.

गोव्यात सकाळपासूनच धुंवाधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. पावसामुळे अनेकठिकाणी झाडांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलची संरक्षक भिंत कारवर कोसळली. या अपघातात वीज खात्याच्या कर्मचारी अर्चना नाईक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

गोव्यात पावसाने हाहाकार माजवला असून सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण गोव्याला पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं असून अनमोड घाटात दरड कोसळली. सध्या ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून. वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अनमोड घाटात दुधसागर मंदिरापासून खालच्या बाजूला गोवा हद्दीत दरड कोसळल्याची माहिती आहे. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गोवा-कर्नाटक मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र दरड कोसळल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT