Accident at Titan Junction Verna Goa Dainik Gomantak
गोवा

वेर्णा येथील टायटन जंक्शनवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

दोन वाहनांचे मोठे नुकसान; वाहनचालकही जखमी

आदित्य जोशी

वास्को/प्रदीप नाईक : वास्कोजवळच असणाऱ्या वेर्णा येथील टायटन जंक्शनवर बुधवारी रात्री 3 चारचाकी वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या विचित्र अपघातात दोन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; काल बुधवारी रात्री बारा वाजता वेर्णा येथे टायटन जंक्शनवर एका मारुती 800 कारने उभ्या असलेल्या स्विफ्ट कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत स्विफ्ट कार पुढे सिग्नलसाठी उभ्या असलेल्या बसवर जाऊन धडकली. यात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या कारमधील चालक किरकोळ जखमांवर बालंबाल बचावले.

अपघातग्रस्त तिन्ही वाहने कुठ्ठाळीच्या दिशेने जात होती. तर बस कंपनीतील कामगारांना घेऊन कुठ्ठाळीच्या दिशेने जात होती. पाठीमागून मारुती 800 कारने स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. यात मारुती कारच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर स्विफ्ट कारचे पाठीमागून नुकसान झाले आहे. अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं चित्र वेर्णा परिसरात पाहायला मिळालं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT