Accident At Porvorim Dainik Gomantak
गोवा

Accident At Porvorim: पर्वरीत अटल सेतुच्या खाली भरधाव कार दुभाजकावर आदळली; ट्रॅफिक जॅममुळे वाहतूक विस्कळीत

जीवीतहानी नाही

Akshay Nirmale

Accident At Porvorim: गोव्यातील पर्वरी येथे सोमवारी दुपारी अटल सेतुच्या खाली कारचा अपघात झाला. या भरधाव कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून ही कार दुभाजकावर धडकली. गोवा सचिवालयाच्या समोरच हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झालेली नाही. तथापि, कारचे मोठे नुकसान झालेले आहे.

दरम्यान, या अपघातामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच वाहनांच्या लांबलचक रांगांमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची स्थिती निर्माण झाली. पर्वरी-पणजी रोड या अपघातामुळे काही काळ ब्लॉक झाला होता.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. अग्निशमन दलाने ही कार हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chapora River: शापोरा नदी घेणार ‘मोकळा’ श्‍‍वास! सव्वालाख घनमीटर गाळ निघणार; सात ते आठ कोटींचा येणार खर्च

‘युके’स्थित गोमंतकीयांनी गोव्याच्या समस्या मांडाव्यात! कॅप्टन विरियातोंचे आवाहन; आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर करण्याची मागणी

Goa Today's News Live: कोलवाळ तुरुंगात पुन्हा राडा; पाच कैद्यांकडून कैदी मोहम्मद रेहानला मारहाण

Margao Dindi Mahotsav: विठ्ठल विठ्ठल!मडगावात 116 व्या दिंडी उत्सवास प्रारंभ; मंत्री कामत यांच्या हस्ते समई प्रज्वलन

Goa Homestay Scheme: गोवा सरकारचे मोठे पाऊल! गावागावांत फुलणार पर्यटन; ‘होमस्‍टे आणि बेड व ब्रेकफास्‍ट’ योजना; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT