Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Viriato Fernandes: 'मोठ्या माशांची नावे अजूनही बाहेर येत नाहीत', Cash For Job विषय संसदेच्‍या चर्चेत आणू; विरियातोंचे मोठे विधान

Goa News: आरोपाचा पुनरुच्‍चार करताना दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी ‘कॅश फॉर जॉब’ विषय संसदेच्‍या लोकसभा अधिवेशनात चर्चेत आणू, असे सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Viriato Fernandes About Cash For Job

मडगाव: गोव्‍यात सध्‍या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्‍यात जी नावे पुढे आली आहेत ती केवळ लहान माशांची असून मोठ्या माशांची नावे अजूनही बाहेर येत नाहीत, या आपल्‍या आरोपाचा पुनरुच्‍चार करताना दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी हा विषय संसदेच्‍या लोकसभा अधिवेशनात चर्चेत आणू, असे सांगितले.

आज मडगावात हॉस्‍पिसियो इस्‍पितळात पाहणी करण्‍यासाठी ते आले होते. त्‍यावेळी प्रसार माध्‍यमांशी बोलताना ते म्‍हणाले, संसदेत या विषयावर गंभीर चर्चा व्‍हावी यासाठी सध्‍या आपण काँग्रेस पक्षाच्‍या इतर नेत्‍यांशी चर्चा करत असून इतर खासदारांच्‍या साहाय्‍याने हा विषय चर्चेत आणण्‍याचा आपला प्रयत्‍न असेल, असे त्‍यांनी सांगितले.

खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट दिली व हृदयरोग तज्ज्ञ नसल्याने आश्र्चर्य व्यक्त केले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, केवळ गुरुवारी एक हृदयरोग तज्ज्ञ येतो असे आपल्याला कळले आहे. हृदयरोग रुग्ण आल्यावर त्याला काही वेळ बसवून ठेवले जाते व नंतर बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठविले जाते. हा वेळेचा अपव्यय आहे.

इस्पितळाची एवढी मोठी इमारत असून येथे जर सर्व सेवा उपलब्ध नसतील, तर त्या इस्पितळाचा उपयोग काय? असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला व तात्काळ हृदयरोग तज्ज्ञाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. या इस्पितळात रुग्णवाहिका नाही ही मोठी त्रुटी आहे, खासदार निधीतून त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘समाज कार्यकर्ते पैसे घेतात असे मी म्हटलेले नाही’

आपण कुठल्याही समाज कार्यकर्त्याच्या विरोधात भाष्य केलेले नाही. वेळसाव इथे मी जे बोललो त्याचा वेगळा अर्थ घेण्यात आला आहे. समाज कार्यकर्ते पैसे घेतात असे आपण म्हटलेले नाही. रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरणासाठी आपला सदैव विरोध राहिला आहे व यापुढेही राहील. गोव्यासंदर्भात जे काही प्रश्न व समस्या असतील, त्या आपण लोकसभेत मांडणार असल्याचेही खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

आंदोलनाची व्यूहरचना सुरू

काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी न्‍यायालयीन आयोगाची स्‍थापना करा अशी मागणी करीत यासाठी एका आठवड्याची मुदत दिली होती. ती उद्या संपत आहे. या मुदतीत हा आयोग स्‍थापन केला नाही, तर काँग्रेस रस्‍त्‍यावर येणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी दिला होता. त्‍यानुसार काँग्रेस रस्‍त्‍यावर उतरणार का असे विचारले असता, या बाबतीतही आपली व्‍यूहरचना चालू आहे एवढेच त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: ब्रम्हांडात मोठी हालचाल! 'या' राशींच्या आयुष्यात सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ; मान-सन्मानही मिळणार

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

SCROLL FOR NEXT