viriato Fernandes  Dainik Gomantak
गोवा

कस्टम अधिकाऱ्यांकडून विदेशी नागरिकाची लुबाडणूक, कॅप्टन विरियातो फर्नांडिस चिडले, म्हणाले...

Captain Viriato Fernandes: एका विदेशी नागरीकाने विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी आपली लुबाडणूक केल्याचे आपल्याला सांगितले आहे, असे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मडगावात पत्रकारांना सांगितले.

Manish Jadhav

सासष्टी: एका विदेशी नागरीकाने विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी आपली लुबाडणूक केल्याचे आपल्याला सांगितले आहे, असे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मडगावात पत्रकारांना सांगितले. त्याचे सोन्याचे दागिने काढून घेतले व वरुन पैशांची मागणी केली. आपण हे प्रकरण केंद्रीय अर्थ मंत्रालय तसेच महसूल संचालनालयाकडे नेणार असल्याचेही खासदाराने सांगितले.

गोव्यात प्रशासन ढासळले असून सरकारचे कुणावरही नियंत्रण राहिले नाही. एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाने गोव्याची बदनामी होत आहे. एस्कॉर्ट सर्व्हिस म्हणजे वेश्या व्यवसाय असा त्याचा अर्थ झाल्याचे सांगून गोवा हे वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ, बेरोजगारीचे केंद्र बनल्याचेही फर्नांडिस यांनी सांगितले.

जर सरकारने सध्या गोव्यात जी बेकायदेशीर कृत्ये चालू आहेत, त्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांना स्वातंत्र्य दिले व पोलिसांनी गैरव्यवहारात गुंतलेल्यांवर कडक कारवाई केली तरच गोवा यातून बाजुला जाऊ शकेल, असेही कॅप्टन म्हणाले. गोव्यात चांगल्या पर्यटकांची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारातील प्रत्येकजण केवळ स्वतःच्या फायद्याचाच विचार करीत असल्याचेही ते म्हणाले.

खासदार कॅ. फर्नांडिस यांनी दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन कार्यालयात लोकांची गाऱ्हाणी ऐकली. माशेल येथील माशेल महिला पतसंस्थेच्या संचालकांनीच कर्जाच्या संदर्भात फसवेगिरी केल्याची तक्रार तेथील काही लोकांनी आपल्याकडे केली, असे खासदार फर्नांडिस यांनी सांगितले. आपण या संदर्भात सहकार निबंधकाकडे तसेच डीओसीकडे तक्रार नोंद करणार आहे. या पतसंस्थेतील भागधारकांचीही फसवणूक झाल्याचे आपल्याला कळले, असे फर्नांडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश! 'महादेवी' नांदणी मठात परतणार; मठ, वनतारा, शासन यांची एकत्रित याचिका

Goa Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री करणं पडलं महागात, पाजीफोंड येथील 24 वर्षीय युवतीला 3.30 लाखांचा चुना; आरोपी गजाआड

Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

Goa Assembly Live: "जर सनबर्न झाला नाही तर दुसरा कोणीतरी येईल" पर्यटन मंत्री

Mapusa heavy rain: म्हापशात दाणादाण! मुसळधार पावसानं झोडपलं; 24 तासांत 4 इंच पाऊस, रस्ते पाण्याखाली

SCROLL FOR NEXT