capt viriato fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa Government : शेतजमिनी रिअल इस्टेट लॉबीच्या घशात घालण्याचा डाव, सुधारित कायद्याबाबत नेत्याला शंका

गोवा काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियेतो फर्नांडिस सरकारवर बरसले

गोमन्तक डिजिटल टीम

capt viriato fernandes : राज्यातील 5 हजारहून अधिक शेतकऱ्यांना दोन पिकांसाठी अनुदान देण्यात आलेली नाही. सरकारने टीसीपी कायद्यात सुधारणा करत शेतजमीन रूपांतरित करुन रिअल इस्टेट लॉबीकडे शेतजमिन सोपवण्याचा कट असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियेतो फर्नांडिस यांनी केला आहे.

भाजपच्या केंद्रातील सरकारने 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याची खोटी आश्वासने दिली. गोवा सरकारने मागील दोन पीकांसाठी राज्यातील 5 हजारहून अधिक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले नाही. श्रीमंत लोकांना त्यांचा काळा पैसा जमिनीत गुंतवण्यासाठी सरकारने मागील अधिवेशनात टीसीपी कायद्यात सुधारणा करत शेतजमीन रिअल इस्टेट लॉबीकडे सोपवण्याचा कट असल्याचा आरोप कॅप्टन विरियेतो यांनी केला.

शेतकऱ्यांना अनुदान न दिल्याने सरकार शेतकऱ्यांचा गळा घोटत आहे. सरकारने अनुदान न दिल्याने शेतकरी कर्जात बुडणार, शेतकरी पीक घेणार नाही नंतर शेतकऱ्यावर रिअल इस्टेट लॉबीला शेतजमीन विकण्यासाठी दबाव टाकला जाणार अशा प्रकारे गोवा सरकार शेतकऱ्यांकडून जमीन हिसकावून घेवून रिअल इस्टेट लॉबीला देण्यात यशस्वी होईल अशी टिका कॅप्टन विरियेतो यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Balli Riots 2011: बाळ्ळी जाळपोळ प्रकरण! आठ वर्षानंतर संशयित बरकत अलीला सौदी अरेबियातून अटक

Pramod Sawant: गोव्यात पुन्हा धर्मांतर खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री प्रमोद सावंत रोख नेमका कुणाकडे?

Ponda Parking Problem: फोंड्यात पार्किंग समस्या जटिल! वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; कायदेशीर कारवाईची होतेय मागणी

Allu Arjun: गोव्यात खरंच दारु खरेदी केली का? सात वर्षानंतर सुपरस्टार अल्लु अर्जुनने सांगितले Viral Video मागील सत्य

Goa Live Updates: धारबांदोडयात आधारकार्ड करेक्शनची पूर्णवेळ सेवा

SCROLL FOR NEXT