Cape Dainik Gomantak
गोवा

Cape News : विठ्ठल मंदिरावर चोरट्यांचा डल्ला; पाच किलो चांदीची चार लाखांची प्रभावळ लंपास

Cape News : शुक्रवार, १० रोजी रात्री १.३० वाजता दोन चोरांनी मंदिरात प्रवेश करून सुमारे पाच किलो वजनाची चांदीची सुमारे चार लाख रुपये किमतीची प्रभावळ चोरून नेली. चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सांगे पोलिस चोरांच्या शोधात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Cape News :

केपे, राज्यात मंदिरांमधील चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबलेले नाही. हल्लीच बोडगेश्‍वर मंदिरात मोठी चोरी झाली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री सांगे येथील विठ्ठल मंदिरात दोघा चोरांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला.

शुक्रवार, १० रोजी रात्री १.३० वाजता दोन चोरांनी मंदिरात प्रवेश करून सुमारे पाच किलो वजनाची चांदीची सुमारे चार लाख रुपये किमतीची प्रभावळ चोरून नेली. चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सांगे पोलिस चोरांच्या शोधात आहेत.

सांगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १.३० वा. दोन चोरांनी मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा तोडून श्री विठ्ठल-रखुमाई देवासमोर असलेली चांदीची प्रभावळ काढून पळ काढला.

दत्तप्रसाद सांगेकर यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली असता पोलिस घटनास्थळी आले, तसेच मंदिर समिती व गावातील लोकांनी मंदिराकडे धाव घेऊन चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ते त्यांच्या हाती लागले नाहीत. चोरांचा शोध घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण केले होते. सांगे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

फंडपेटी, कपाटातील ऐवज सुरक्षित

चोर चांदीची प्रभावळ घेऊन पसार झाले; पण त्यांनी फंडपेटी तसेच आतील कपाटाला हात लावला नाही. कपाटात मंदिराच्या उत्सवात वापरात येणाऱ्या सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती आणि मुखवटे होते, असे देवस्थानचे सदस्य नारायण मसुरकर यांनी सांगितले.

पाठलाग करणाऱ्यांवर दगडफेक

मंदिराशेजारीच राहणाऱ्या दत्तप्रसाद सांगेकर यांना आवाज आल्याने त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता, दोन अज्ञात व्यक्ती काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांना पकडण्यासाठी ते मागे गेले असता, त्यांच्यावर दगडफेक केल्याने त्यांनी माघारी येऊन मंदिरात पाहिले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT