Cape Dainik Gomantak
गोवा

Cape News : पिर्ल, केपेत बेकायदा चिरे खाणीवर धाड; खनिजकर्म खात्याची कारवाई

Cape News : केपेचे संयुक्त मामलेदार आणि केपे पोलिसांच्या उपस्थितीत धडक कारवाई करून पाच पॉवर ट्रिलर आणि चिरे काढण्याचे चार यंत्रे मिळून लाखो रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cape News :

केपे, पिर्ल, केपे येथे बुधवारी सकाळी खाण खात्याने बेकायदा सुरू असलेल्या चिरे खाणीवर धाड टाकून चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारी नऊ यंत्रे जप्त केली.

या परिसरात चिरे काढण्यासाठी झाडांची बेसुमार कत्तल केली असून कोट्यवधी रुपयांचे चिरे काढून नेले आहेत. केपेचे संयुक्त मामलेदार आणि केपे पोलिसांच्या उपस्थितीत धडक कारवाई करून पाच पॉवर ट्रिलर आणि चिरे काढण्याचे चार यंत्रे मिळून लाखो रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

पिर्ला येथील नवीन पंचायत घराजवळ ही खाण गेल्या कित्येक महिन्यापासून सुरू होती. उपनिरीक्षक गौतम शेटकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, जागेचे मालक उल्हास देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

...अन् कामगार झाले पसार

खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी पोलिस संरक्षणात खाणीवर धाड टाकली. नेहमीप्रमाणे नऊ यंत्रे लावून चिरे काढण्याचे काम सुरू होते.अधिकारी येत असल्याचे पाहून परप्रांतीय कामगारांनी सर्व यंत्रे तिथेच टाकून जंगलात पलायन केले.

केपेचे संयुक्त मामलेदार साळगावकर यांनी तलाठ्याबरोबर घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. केपेचे पोलिस उपनिरीक्षक गौतम शेटकर यांनी पंचनामा केल्यानंतर मामलेदार साळगावकर यांनी सर्व यंत्रे जप्त करून ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दिवाळीचा 'झगमगाट' आणि आपत्तीचा 'अंधार': संवेदनशीलतेचा दिवा कधी पेटणार? - संपादकीय

Porvorim Flyover: "पर्वरी उड्डाणपुलाचे काम वाहतूक न थांबवता पूर्ण करा", मंत्री खंवटे यांचे कंत्राटदारांना निर्देश

Goa Politics: खरी कुजबुज; रवींनी 'तो' निर्णय का घेतला?

Salcete: नवीन कचरावाहू कॉम्पॅक्टर निकामी, मडगाव पालिकेने मागविलेल्या वाहनात तीनच दिवसांत बिघाड

Goa Live News: मंत्री रोहन खवंटे आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी सहा-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाची केली प्रत्यक्ष पाहणी

SCROLL FOR NEXT