Quepem Road  Dainik Gomantak
गोवा

Quepem Road : केपेत चित्ररथांनी रस्‍ते व्यापल्‍याने वाहने गटारात

Quepem Road : प्रवासी बस, ट्रक कलंडले : वाहतूक आमोणामार्गे वळविली

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem Road

केपे, आज सकाळी केपे बाजारात रस्त्याच्या बाजूला चित्ररथ उभे करून ठेवल्याने दुसऱ्या वाहनाला बाजू देताना एक ट्रक व प्रवासी बसची मागची चाके रुतून पडल्याने केपे ते मडगाव मार्गे होणारी अवजड वाहतूक कट्टा आमोणामार्गे वळविण्यात आली होती.

केपेत आज शिगमोत्सव मिरवणूक असल्याने काल रात्री कुडचडे येथील शिगमोत्सवात सहभागी झालेले चित्ररथ केपे येथे मुख्य रस्त्याच्या एका बाजूने रांगेत उभे करून ठेवल्याने केपे ते मडगावला होणारी वाहतूक खोळंबून पडली होती

त्यात सदर रस्ता बराच अरुंद सल्याने वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांनी मडगावहून येणारी प्रवासी बस व एक ट्रक पुढून येणाऱ्या वाहनांना वाट करून देण्यासाठी बाजूला घेतल्याने पूर्वीच कमकुवत झालेल्या पथपदावरील लाद्या वाहनांच्या वजनाने तुटल्याने बस व ट्रक कलंडल्याने केपे ते मडगाव रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक कट्टा आमोणामार्गे वळविण्यात आल्याने प्रवाश्यांचे बरेच हाल झाले. साधारण चार तासांनी ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आयोजकांच्या नावाने लोकांनी फोडले खडे

केपे शिमगोत्सवातील आयोजकांच्या गलथान कारभारामुळे शुक्रवारी केपे ते मडगाव या मुख्य रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीत बराच अडथळा आल्याने लोकांनी आयोजकांच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

जिकडेतिकडे चित्ररथ उभे असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत होता. लोकांना कामावर जाण्यास उशीर होत होता तर अनेक ठिकाणी वाहने रस्त्याबाजूला कलंडण्याच्या घटना घडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT