Canter of accident is still on road in Borim Dainik Gomantak
गोवा

बोरी अपघातातील कँटर अद्याप रस्त्यावरच!

पुन्हा अपघाताचा धोका बोरी सर्कलजवळ वाहतुकीस अडथळा

दैनिक गोमन्तक

बोरी: अपघातप्रवण भागातील बोरी सर्कल येथे 1 एप्रिल रोजी एका कँटरने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या जबरदस्त अपघातातील कँटर गेल्या पाच दिवसांपासून रस्त्यावरच आहे. या कँटरने रस्ता अडविल्याने बोरी सर्कलच्या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

बोरी नव्या पुलाच्या जोड रस्त्यावरील पाच संरक्षक बेटांच्या चोहोबाजूंनी जाणारा रस्ता हा गावातील प्रमुख अपघाताचे ठिकाणी बनलेला आहे. या संरक्षक बेटावर वारंवार लहान मोठे अपघात घडतात.

1 रोजी पहाटे वास्को येथून बेळगावच्या दिशेने जाणारा एमएच 04 एफ यू 3305 या क्रमांकाच्या कँटरने समोरून जाणाऱ्या मालवाहू ट्रकवर जोरदार धडक दिल्याने या कँटरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. त्यानंतर फोंडा पोलिसांनी हा कँटर क्रेन आणून थोडा बाजूला हटवला, तरीही तो अर्धाअधिक रस्ता अडवून आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना बाजू देता येत नाही.

बोरी पुलावरून वास्को बंदरातून येणाऱ्या मालाची ने आण करणारी अवजड मालवाहू वाहने तसेच इंधन घेऊन बेळगाव, हुबळी, कोल्हापूर आदी भागात जाणारे टँकर याच उतरणीच्या रस्त्यावरून फोंडामार्गे राज्याच्या अन्य भागात जातात. हा कँटर रस्त्यावर असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधितांनी हा कँटर येथून हटवून रस्ता मोकळा करावा. अन्यथा या ठिकाणी आणखीही अपघात घडण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT