Shivaji Maharaj Statue in Goa Dainik Gomantak
गोवा

Curchorem: धक्कादायक! शिवरायांच्या पुतळ्याखाली आढळली गांजाची 'रोपं'; स्मार्ट पणजीनंतर कुडचडेत खळबळ

Curchorem Goa News: ही रोपं नेमकी कोण रोवतंय याची अजून माहिती मिळाली नाहीये

Akshata Chhatre

कुडचडे: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी गांजाची रोपं सापडल्याच्या घटना उघकीस येतायत. पणजी स्मार्टसिटीमध्ये दोन वेळा गांजाची रोपं आढळून आली.

या रोपांची नेमकी लागवड कोण याची अजून माहिती मिळाली नाहीये मात्र आता पुन्हा एकदा गोव्यात गांजाचं रोप सापडलं आहेत. सोमवारी (दि. २० जानेवारी) रोजी कुडचड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी गांजाची रोपटी आढळून आली आहेत.

पुतळ्यापासून काही किलोमीटर अंतरावरच कुडचडे पोलीस स्थानक असून देखील याबद्दल कुणालाही माहिती नव्हती. संध्याकाळी या घटनेची माहिती मिळताच याबद्दल चर्च सुरु झाली असून या गांजाची किंमत लाखो रुपयांच्या आसपास जाणायची शक्यता वर्तवली जातेय. कुडचडे येथील शिवाजी सर्कल हा रस्त्याचा मुख्यभाग आहे.

इथे केपे,मडगाव, चांदोर अशा भागांमधून वेळोवेळी गाड्यांची ये-जा सुरु असते. शिवाय सावर्डे, कुळे, धारबांदोडा येथे जाण्यासाठी सुद्धा हाच रास्ता वापरला जातो. मग अशा वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार कसा घडावा यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

सकाळी गांजा सापडून देखील यावर कारवाई होत नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. स्मार्टसिटीनंतर आता वेगळया एका भागात गांजाची रोपं सापडली असल्याने यामागे नेमका कोणाचा हात असू शकतो असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT